Join us

सिलिंडर स्फोटात ४ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 14:10 IST

मुंबई - कुर्ल्यामध्ये बैल बाजार परिसरातील क्रांती नगरमध्ये चाळीत झालेल्या सिलिंडर स्फोटात एका ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे ...

ठळक मुद्देसिलिंडरच्या स्फोटामुळे चाळीला आग लागली. सिलिंडर स्फोटात एका ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला

मुंबई - कुर्ल्यामध्ये बैल बाजार परिसरातील क्रांती नगरमध्ये चाळीत झालेल्या सिलिंडर स्फोटात एका ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच एक तरुण जखमी झाला. ही घटना काल सायनकाळी ५. ३० वाजताच्या सुमारास घडली. 

सिलिंडरच्या स्फोटामुळे चाळीला आग लागली. मात्र, अग्निशमन दलाजवान घटनास्थळी पोचले आणि काही वेळातच त्यांनी ही आग आटोक्यात आणली. या सिलिंडर स्फोटात गंभीर जखमी झालेल्या अनुष्का चौरसिया या ४ वर्षाच्या चिमुकलीला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दाखल करण्याआधीच डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. स्फोटात रवी परमार हा 21 वर्षाचा तरुण जखमी झाला आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

टॅग्स :स्फोटगॅस सिलेंडरमृत्यू