मुंबईत वरळी सी फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 11:02 IST2023-07-05T10:18:27+5:302023-07-05T11:02:57+5:30

वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Dead body of young woman found in sack on Worli sea face in Mumbai, case registered against unknown person | मुंबईत वरळी सी फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

मुंबईत वरळी सी फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील वरळी सी फेसवर एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वरळी सी फेसवर एका अज्ञात तरुणीचा मृतदेह गोणीत आढळून आला. समुद्राच्या पाण्यातून बाहेर आलेला हा तरुणीचा मृतदेह हात-पाय तुटलेल्या अवस्थेत गोणीत होता. अंदाजे ५ ते ७ दिवसांपूर्वी तरुणीचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, मृत तरुणीचे वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. तरुणीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी परीक्षेला जाणाऱ्या एका तरुणीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशिद बंदर स्थानकादरम्यान एका व्यक्तीने लोकलमध्ये अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय, चर्नी रोड ते चर्चगेट स्थानकादरम्यान लोकलमध्ये एका महिलेचा अज्ञाताकडून विनयभंग करण्यात आला होता. आता वरळी सी फेसवर आढळलेल्या मृतदेहामुळे मुंबईत महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: Dead body of young woman found in sack on Worli sea face in Mumbai, case registered against unknown person

टॅग्स :Mumbaiमुंबई