Join us

यह एक चिराग कई आँधियों पे भारी हैं ! फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, आठवलेंच्याही थाटात कविता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 06:14 IST

अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शायराना अंदाजमध्ये विरोधकांवर विधानसभेत निशाणा साधला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:  दुआ करो की सलामत रहे मेरी हिंमतयह एक चिराग कई आँधियों पे भारी हैं...

अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शायराना अंदाजमध्ये विरोधकांवर बुधवारी विधानसभेत निशाणा साधला. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी या चर्चेत सहभागी होताना, ‘इत्र सें कपडो को महकाना कोई बडी बात नही, मजा तो तब है, जब आपके किरदार से खुशबू आए...,’ असे सुनावले होते. त्यावर फडणवीस यांनी ‘यह एक चिराग कई एक आँधियों पर भारी हैं’ असे म्हणत टोलेबाजी केली. आपण मांडलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचे ते म्हणाले.

‘मुश्किलें जरुर है मगर, ठहरा नही हूँ मैं...मंजिलों से कह दो अभी पहुँचा नही हूँ मैं...’ 

असे म्हणत त्यांनी विरोधकांना सुनावले. चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले होते की, अर्थसंकल्प म्हणजे ‘बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी। जेऊनिया कोण तृप्त झाला॥’ पण हे महाविकास आघाडीच्या संदर्भात होते. आमच्या सरकारसंदर्भात ते ‘आजि देतो पोटभरी। पुरें म्हणाल तोवरि॥’ असे असल्याचे फडणवीस म्हणाले. 

‘दोघांमध्ये तिसरा आलासांगा कोण कुणाचा लव्हर आहे ?नेमकेचि बोलायचे तर,प्रेमग्रंथाला भगवे कव्हर आहे...’ ही सूर्यकांत डोळस यांची वात्रटिका उद्धृत करत फडणवीसांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना चिमटे काढले.

थोरात - विखेंमध्ये स्पर्धा पण...

बाळासाहेब थोरात यांनी अर्थसंकल्पावर केलेल्या टीकेचा संदर्भ देऊन  फडणवीस म्हणाले की थोरात हे प्रामाणिक व्यक्ती आहेत यावर माझा पूर्ण विश्वास आहे. यावर विरोधकांनी मग विखे कसे आहेत, असा सवाल केला. त्यावर फडणवीस म्हणाले की विखे अधिक प्रामाणिक आहेत पण या दोघांमध्ये सज्जनपणाची स्पर्धा आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अर्थसंकल्पीय अधिवेशनदेवेंद्र फडणवीस