Join us  

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी दत्ता पडसलगीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 3:40 PM

पोलीस महासंचालक सतीश माथूर जूनअखेरीस निवृत्त होणार

मुंबई: राज्याच्या पोलीस महासंचालकपदी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती होणार आहे. सध्या पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी सतीश माथूर यांच्याकडे आहे. ते जूनअखेरीस निवृत्त होत आहेत. त्यानंतर दत्ता पडसलगीकर महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारतील. पडसलगीकर यांच्याकडे सध्या मुंबईचं आयुक्तपद आहे. पडसलगीकर महासंचालक झाल्यावर मुंबईच्या आयुक्तपदी संजय बर्वे यांना संधी मिळणार आहे. सतीश माथूर जूनअखेरीस सेवाज्येष्ठतेनुसार निवृत्त होतील. त्यानंतर पोलीस महासंचालकपदाची धुरा दत्ता पडसलगीकर यांच्या खांद्यावर येईल. सेवाज्येष्ठतेनुसार पडसलगीकरदेखील ऑगस्टअखेरीस निवृत्त होतील. मात्र त्यांची 36 वर्षांची निष्कलंक सेवा लक्षात घेऊन त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत पडसलगीकर महासंचालकपदी राहतील. त्यामुळे फेब्रुवारीत मुंबईच्या आयुक्तपदासोबतच महासंचालकपददेखील रिक्त होईल. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती होऊ शकते. सिंग यांनी गेल्या तीन वर्षांत ठाण्यात चांगली कामगिरी बजावली आहे. तर राज्याच्या महासंचालकपदाची धुरा संजय बर्वे यांच्या खांद्यावर येऊ शकते. बर्व हे अतिशय कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. बर्वे पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. 

टॅग्स :पोलिसमहाराष्ट्रमुंबई पोलीस