Join us  

शेजारच्या राज्यात असलेल्या निवडणुकांमुळे राज्यात अंधार, राष्ट्रवादीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 2:35 AM

महाराष्ट्रातील लोडशेडिंगला भाजपाचे निवडणुकांचे राजकारण जबाबदार आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला कोळसा भाजपाने निवडणुकीला सामोरे जात असलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात वळविला आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील लोडशेडिंगला भाजपाचे निवडणुकांचे राजकारण जबाबदार आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला कोळसा भाजपाने निवडणुकीला सामोरे जात असलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात वळविला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला वीजटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.गुरुवारी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मलिक म्हणाले की, राज्यातील वीजटंचाई ही राजकीयदृष्टया तयार करण्यात आली आहे. राज्यात अघोषित भारनियमन सुरू आहे.राज्यात अनेक ठिकाणी ११-१२ तास वीज गायब आहे. वीजेची कमतरता भासत होती तर त्यांनी जनतेला भारनियमनाची कल्पना द्यायला हवी होती. परंतु सरकार ही माहिती लपवून ठेवत आहे. जनतेला माहिती न देता त्यांना अडचणीत आणले जात आहे. एका महिन्यापूर्वी राजस्थानमध्ये जवळपास २५०० मेगावॅटचा तुटवडा होता. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला कोळसा तिकडे पाठविण्यात आला. निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राज्यांमध्ये अखंडीत वीजपुरवठा करण्याचा डाव यामागे आहे. त्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र अंधारात ढकलल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचा वीजखात्यामध्ये ठेका आहे. बावनकुळे आणि ऊर्जा खात्यातील चार कंपन्यांचे सल्लागार असलेले विश्वास पाठक यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे. त्यामुळे त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही मलिक यांनी केली.वीजटंचाई राजकीयराज्यातील वीजटंचाई ही राजकीयदृष्ट्या तयार करण्यात आली आहे. निवडणुकीला सामोरे जाणाºया राज्यांमध्ये अखंडीत वीजपुरवठा करण्याचा डाव यामागे आहे, असा आरोप रनवाब मलिक यांनी केला.

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र