Sameer Wankhede: समीर वानखेडेंविरोधात आता दलित संघटना आक्रमक, जात पडताळणी समितीकडे केली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 16:56 IST2021-11-04T16:54:38+5:302021-11-04T16:56:39+5:30
अमलीपदार्थ विरोधी पथकाचे (NCB) मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे

Sameer Wankhede: समीर वानखेडेंविरोधात आता दलित संघटना आक्रमक, जात पडताळणी समितीकडे केली तक्रार
मुंबई-
अमलीपदार्थ विरोधी पथकाचे (NCB) मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी वानखेडे यांचीच चौकशी आता होत असताना राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनीही वानखेडे यांच्यावर जातीचा खोटा दाखल दाखवून नोकरी लाटल्याचा केला आहे. त्यात आता दलित संघटनाही आक्रमक झाल्या असून समीर वानखेडे यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे.
नोकरी मिळवण्यासाठी समीर वानखेडे यांनी स्वत:ला दलित असल्याचं दाखवलं असा दावा दलित संघटनांनी केला आहे. नोकरीतील आरक्षण प्राप्त करण्यासाठी वानखेडे यांनी खोटी कागदपत्रं सादर केली असा आरोप स्वाभीमानी रिपब्लिकन आर्मी आणि भीम आर्मीनं केला आहे. या दोन्ही संघटनांकडून जिल्हास्तरीय जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
खरंतर काही दिवसांपूर्वीच समीर वानखेडे यांनी दिल्लीतील अनुसूचित जाती आयोगाच्या कार्यालयात हजर राहून त्यांच्या जवळील सर्व कागदपत्रं सादर केली होती. आयोगासमोर वानखेडे यांनी पहिल्या पत्नीकडून झालेल्या मुलाचा जन्म दाखला आणि घटस्फोटाची कागदपत्रं सादर केली. आयोगाकडून या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. पण त्याआधीच वानखेडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
वानखेडे मुस्लिम की दलित? वाद सुरूच
समीर वानखेडे यांच्या वडीलांनी ते दलीत असून माझा मुलगा समीर देखील दलितच आहे यावर जोर दिला होता. मुस्लिम धर्माशी आपलं काहीच घेणंदेणं नाही असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांनी वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा केला आहे. मुस्लिम पद्धतीनंच समीर वानखेडे यांचा निकाह झाला होता असा दावा त्यांनी केला आहे.