Join us  

पुनश्च हरिओममध्ये प्रवाशांसाठी ‘बेस्ट’च सरस, दररोजची प्रवासी संख्या दहा लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 2:55 AM

अत्यावश्यक सेवा वगळता अन्य प्रवाशांसाठी रेल्वेसेवा बंद असल्याने  प्रवाशांची पसंती बेस्ट सेवेला मिळत आहे.

मुंबई : पुनश्च हरिओम अंतर्गत मुंबईतील व्यवहार टप्प्याटप्प्याने खुले करण्यात येत आहेत. यास आता एक महिना पूर्ण होत असताना या काळात बेस्ट सेवा प्रवाशांसाठी सरस ठरली आहे. या महिन्याभरात बेस्ट प्रवाशांची संख्या हळूहळू वाढत आता दहा लाखांवर पोहोचली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य प्रवाशांसाठी रेल्वेसेवा बंद असल्याने  प्रवाशांची पसंती बेस्ट सेवेला मिळत आहे.त्याचबरोबर वाहतूककोंडीचे प्रमाणही कमी असल्याने बेस्ट सेवा जलद ठरत आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत खाजगी, सरकारी कार्यालये, दुकाने, मंडया सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे आपले कार्यालय गाठण्यासाठी प्रवाशांची गर्दी बेस्ट थांब्याकडे वळत आहेत. बेस्ट उपक्रमाने आता बसगाड्यांची संख्याही वाढवली आहे. मंगळवारी तब्बल तीन हजार १२५ बसगाड्या चालविण्यात आल्या. या गाड्यांमधून नऊ लाख ९० हजार १४४ प्रवाशांनी प्रवास केला.  ८८ लाख पाच हजार ११९ रुपये उत्पन्न बेस्टला प्रवासीभाड्यातून मिळाले. लॉकडाऊननंतरची ही सर्वांत मोठी प्रवासी संख्या आहे.फिडर मार्गांवर चालवणार जादा बस गाड्याअत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे बेस्ट उपक्रमानेही फिडर मार्गांवर बस सेवा सुरू केल्या. अनेक सरकारी - खाजगी कार्यालये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, कुर्ला आणि दादर अशा प्रमुख स्थानकांवर बस सेवा सुरू केली आहे. 

टॅग्स :लॉकडाऊन अनलॉकमुंबईबेस्ट