दहिसर मिनिथॉन २५ सप्टेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2016 05:27 IST2016-09-09T05:27:18+5:302016-09-09T05:27:18+5:30

शालेय धावपटूंमध्ये लोकप्रिय असलेली प्रतिष्ठेची दहिसर मिनिथॉन स्पर्धा येत्या २५ सप्टेंबरला रंगणार आहे. मुंबई उपनगर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेने दहिसर ट्रॅक मास्टर्स

Dahisar Miniton on September 25 | दहिसर मिनिथॉन २५ सप्टेंबरला

दहिसर मिनिथॉन २५ सप्टेंबरला

मुंबई : शालेय धावपटूंमध्ये लोकप्रिय असलेली प्रतिष्ठेची दहिसर मिनिथॉन स्पर्धा येत्या २५ सप्टेंबरला रंगणार आहे. मुंबई उपनगर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेने दहिसर ट्रॅक मास्टर्स आणि दहिसर स्पोटर््स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने होणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे १९वे वर्ष आहे.
दहिसर पुर्वेकडील मातृछाया हायस्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज येथून सकाळी ६.३० वाजता सुरु होणारी ही स्पर्धा मुला-मुलींच्या प्रत्येकी ४ गटात पार पडेल. १६ वर्षांखालील मुलांची शर्यत ५ किमी अंतराची असून याच गटातील मुलींची शर्यत ३ किमी अंतराची असेल. त्याचप्रमाणे १४ वर्षांखालील (मुले - मुली प्रत्येकी ३ किमी), १२ वर्षांखालील (मुले - मुली प्रत्येकी २ किमी) आणि १० वर्षांखालील (मुले - मुली प्रत्येकी १ किमी)
अशा वयोगटातही ही शर्यत
होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Dahisar Miniton on September 25