Join us

Dahi Handi 2018 : कुशचा थरामुळे मृत्यू नाही तर फिटमुळे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 20:55 IST

पहिल्या थरावर चढण्याचा प्रयत्नात असताना त्याला फिट आली आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती याप्रकरणी पोलिसात जबाब नोंदविलेल्या प्रत्यक्षदर्शी असलेल्या दिलीप नारायणकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. 

मुंबई - धारावी येथील राम गुंफा चाळीत राहणाऱ्या कुश खंदारे (वय २६) या तरुणाचा आज दुर्दैवी गोविंदा पथकात सामील असताना मृत्यू झाला. आज दुपारी ३. ३० वाजताच्या सुमारास बाळ गोपाळ मित्र मंडळ दही हंडीचे थर रचत असताना कुश हा खाली असताना आणि पहिल्या थरावर चढण्याचा प्रयत्नात असताना त्याला फिट आली आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती याप्रकरणी पोलिसात जबाब नोंदविलेल्या प्रत्यक्षदर्शी असलेल्या दिलीप नारायणकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. 

मुंबई पोलिसांचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांनी धारावीत राम गोपाळ चाळीत राहणार कुश खंदारे हा बाळ गोपाळ मित्र मंडळाच्या गोविंदा पथकात सामील झाला असताना दहीहंडी पहिल्या थरावर चढला असता त्याला आकडी येऊन बेशुद्ध झाल्याने उपचारासाठी सायन रुग्णालय येथे घेऊन गेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दाखल पूर्व मयत घोषित केले अशी माहिती दिली. त्यामुळे कुश या तरुणाचा एपिलेप्टिक फिटमुळे मृत्यू झाल्याची शक्यता आहे. दिलीप यांनी कुश हा तब्येतीने अशक्त असून तो थरावर चढला नसून तो तळालाच होता. मात्र, तो पहिल्या थरावर चढण्याच्या प्रयत्नात होता असे सांगितले. कुश हा अंधेरीतील एका कंपनीत हाऊस किपिंगचे काम करायचा. त्याच्या जुळ्या भावाचे नाव अवि असे आहे अशी माहिती त्यांनी दिली. 

एपिलेप्टिक फिट कश्यामुळे येते? 

१. डोक्याला मार लागला 

२. फिट येण्याची सतत सवय असेल तर 

३. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले तर 

४. लहान मुलांचा ताप १०२ डिग्री एफपेक्षा वर गेला तर काही मुलांना फिट येण्याची शक्यता असते 

टॅग्स :मुंबईदही हंडीमृत्यू