Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 07:05 IST

गीता या माजी नगरसेवक आहेत. त्या आधी सलग निवडून आल्या आहेत. योगिता या पहिल्यांदाच रिंगणात उतरल्या आहेत.

मुंबई : अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी आणि योगिता या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. गीता यांनी प्रभाग क्रमांक २१२ आणि योगिता यांनी प्रभाग क्रमांक २०७ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी अखिल भारतीय सेनेमधून अर्ज दाखल केले आहेत.

२३ डिसेंबर रोजी एकूण ४ हजार १६५ अर्जांचे तर, २४ डिसेंबर रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण २ हजार ८४४ उमेदावरी अर्जांचे वितरण झाले होते. तसेच, २ अर्ज दाखल झाले होती. नामनिर्देशन पत्रे वितरणाच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी २ हजार ४० उमेदवारी अर्जांचे वितरण झाले आहे. तर, ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

दरम्यान, गीता या माजी नगरसेवक आहेत. त्या आधी सलग निवडून आल्या आहेत. योगिता या पहिल्यांदाच रिंगणात उतरल्या आहेत. अरुण यांच्या भावजई वंदना यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ती जागा योगिता लढणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Arun Gawli's daughters in Mumbai election; sister-in-law joins Shinde Sena.

Web Summary : Arun Gawli's daughters, Geeta and Yogita, are contesting Mumbai elections. Geeta, a former corporator, is contesting from ward 212, while Yogita is contesting from ward 207. Gawli's sister-in-law, Vandana, joined Shinde Sena; Yogita will contest that seat.
टॅग्स :अरुण गवळीमुंबई महापालिका निवडणूक २०२६महानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६