डॉ. विजय दर्डा यांना ‘दादासाहेब फाळके आयकॉन’ अवॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 06:03 AM2023-12-16T06:03:22+5:302023-12-16T06:03:32+5:30

विविध क्षेत्रांतील मान्यवरांना त्यांच्या प्रदीर्घ सेवेकरीता दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

Dadasaheb Phalke Icon' Award to dr. Vijay Darda | डॉ. विजय दर्डा यांना ‘दादासाहेब फाळके आयकॉन’ अवॉर्ड

डॉ. विजय दर्डा यांना ‘दादासाहेब फाळके आयकॉन’ अवॉर्ड

मुंबई : लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांना दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांना त्यांच्या प्रदीर्घ सेवेकरीता दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

अंधेरीतील मुक्ती फाउंडेशन सभागृहात  दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कारांसोबत मुंबई पोलिस अचिव्हमेंट अवॉर्डसही प्रदान करण्यात आले. कल्याणजी जाना मागील पाच वर्षांपासून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करीत आहेत. पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मनोरंजनपर कार्यक्रमात उत्कृष्ट नेतृत्व आणि देश तसेच मानवतेच्या अविरत सेवेकरिता डॉ. विजय दर्डा यांचा दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्काराने गौरव करण्यात आला.

या सोहळ्यात अभिनेत्री स्नेहा वाघ, वैदेही नायर, सहर्षकुमार शुक्ला, डॉ शशांक सुभाष, मनोज शर्मा, संदीप शाह, सोनिया बन्सल, न्यारा बॅनर्जी, शिव ठाकरे, पालक सिधवानी, शफाक नाझ, मनात जौरा, मिताली नाग, रोहन मेहता, रोझलीन खान, इंदिरा कृष्णन आदी मान्यवरांनाही दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Web Title: Dadasaheb Phalke Icon' Award to dr. Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.