The Dadar-Sawantwadi Express will be back on track from September 26 | दादर-सावंतवाडी एक्सप्रेस २६ सप्टेंबरपासून पुन्हा रुळावर, दररोज धावणार

दादर-सावंतवाडी एक्सप्रेस २६ सप्टेंबरपासून पुन्हा रुळावर, दररोज धावणार

कोकणातील जनतेसाठी सोडण्यात आलेली दादर-सावंतवाडी एक्सप्रेस कोरोनाच्या संकटात बंद करण्यात आली होती. आता ती पुन्हा एकदा २६ सप्टेंबरपासून धावणार आहे. त्यामुळे कोकणात ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा फायदा होणार आहे. याबाबतची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वे दादर ते सावंतवाडी रोडदरम्यान विशेष ट्रेन चालविणार आहे. या विशेष गाड्या पूर्णपणे आरक्षित असतील. मान्सून/नॉन-मॉन्सूनच्या वेळेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

मान्सूनच्या वेळा 
१) दादर-सावंतवाडी रोड विशेष ट्रेन

01003 विशेष गाडी दादरहून दररोज 00.05 वाजता दिनांक  26.9.2020 ते 31.10.2020 पर्यंत सुटेल आणि सावंतवाडी रोडला त्याच दिवशी 12.20 वाजता पोहोचेल.
01004 विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दररोज 17.30 वाजता दिनांक 26.9.2020 ते 31.10.2020  दरम्यान सुटेल आणि  दुसर्‍या दिवशी दादरला 06.45 वाजता पोहोचेल.
 
थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण , सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
 
नॉन-मॉन्सूनच्या वेळा 

२) दादर-सावंतवाडी रोड विशेष ट्रेन

01003 विशेष गाडी दादरहून दररोज 00.05 वाजता दिनांक  01.11.2020 पासून ते पुढील सूचना मिळेपर्यंत सुटेल आणि सावंतवाडी रोडला त्याच दिवशी 10.40 वाजता पोहोचेल.
01004 विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दररोज 18.50 वाजता दिनांक  01.11.2020 पासून ते  पुढील सूचना मिळेपर्यंत सुटेल आणि  दुसर्‍या दिवशी दादरला 06.45 वाजता पोहोचेल. 

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण , सावर्डा , अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ. 
 
संरचनाः एक एसी -२ टायर, चार एसी-3 टायर, 8 स्लीपर क्लास, 6 द्वितीय श्रेणी सिटींग राखीव डबे.
 
आरक्षणः 01003/01004 विशेष गाड्यांचे बुकिंग दिनांक 24.9.2020 पासून सर्व आरक्षण केंद्रांवर व www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल.

केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येईल

प्रवाशांनी  बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड - 19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The Dadar-Sawantwadi Express will be back on track from September 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.