Join us  

'चक्रीवादळ गुजरातला पळवण्याचा डाव, संजय राऊत मुंबईतच अडवणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 6:31 PM

महाराष्ट्र कोरोना संकटाचा सामना करत असताना आता तौत्के चक्रीवादळाच्या संकटालाही सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकार खंबीरपणे या संकाटलाही तोंड देत आहे.

ठळक मुद्देएकीकडे कोरोना आणि दुसरीकडे चक्रीवादळ या संकटातही सोशल मीडियावर हशा पिकवणाऱ्यांची कमी नसते. सोशल मीडियावर तौत्के चक्रीवादाळावरुन जोक्स व मिम्स व्हायरल होत आहेत

मुंबई - तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला असून अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. समुद्रात उंचच उंच लाटा उसळल्या आहेत. सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. त्यामुळे गोवा किनारपट्टीपासून 150 किमी आतमध्ये  चक्रीवादळला (Cyclone in Arabian Sea) सुरुवात झाली आहे. याचा मोठा फटका भारताच्या पश्चिम किनारपट्टीला बसला असून हे वादळ मुंबईमार्गे गुजरातच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. यावरुनच भाजपा खासदाराने शिवसेने नेते संजय राऊत यांना टोला लगावला आहे. 

महाराष्ट्र कोरोना संकटाचा सामना करत असताना आता तौत्के चक्रीवादळाच्या संकटालाही सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकार खंबीरपणे या संकाटलाही तोंड देत आहे. मागील काही तासांपासून मुंबईत मुसळधार पाऊस (Rain in Mumbai) कोसळत असून अनेक ठिकाणी झाडं, विजेचे खांब कोसळले आहेत. तर काही ठिकाणी रस्तेही तुंबले आहेत. राजापूर, रत्नागिरीच्या किनारपट्टीभागात सोसाट्याचा वारा सुरू असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तौत्क चक्रीवादळ कोकण किनारपट्टीसह मुंबई जवळून प्रवास करणार आहे. त्यामुळे किनारपट्टीभागात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे चक्रीवादळ या संकटातही सोशल मीडियावर हशा पिकवणाऱ्यांची कमी नसते. सोशल मीडियावर तौत्के चक्रीवादाळावरुन जोक्स व मिम्स व्हायरल होत आहेत. त्यातच, जळगावचे भाजपा खासदार उन्मेश पाटील यांनीही एक ट्विट करुन हशा पिकवला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोलाही लगावलाय

चक्रीवादळ गुजरातला पळविण्याचा मोदी-शहांचा डावसंजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार, असे मजेशीर ट्विट पाटील यांनी केलंय. 

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये पोहोचून आढावा घेतला. मुंबईकरांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले आहे. (aditya thackeray appeals mumbaikars to stay home safely during cyclone tauktae) आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्वाच्या सूचनाही केल्या. वादळाची तीव्रता सायंकाळ किंवा रात्रीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ ११४ किमीच्या वेगाने रेकॉर्डब्रेक करत मुंबईवर आदळले आहे.  आतापर्यंतचे हे सर्वात मोठे चक्रीवादळ असून झालेल्या परिणामांचा आणि सद्यस्थितीचा आढावा घेत अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलेय. 

टॅग्स :नरेंद्र मोदीकोरोना वायरस बातम्याचक्रीवादळतौत्के चक्रीवादळ