Join us  

पूल कोसळण्याची दुर्घटना ही मुबईकरांच्या दृष्टीने चिंतेचा विषय - शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 4:34 PM

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जो अपघात झाला तो मुंबईकरांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. कारण देशात आर्थिक राजधानी असलेल्या या शहराची गर्दी वाढत आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी शहराच्या रचनेत काही बदल करणे गरजेचे आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले 

मुंबई - गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जो अपघात झाला तो मुंबईकरांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. कारण देशात आर्थिक राजधानी असलेल्या या शहराची गर्दी वाढत आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी शहराच्या रचनेत काही बदल करणे गरजेचे आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले 

मुंबईत पत्रकार परिषदेला संबोधित करताना शरद पवार यांनी मुंबईतील पूल दुर्घटनेवर भाष्य केले. शरद पवार म्हणाले की, विरार ते चर्चगेट तसेच कर्जत ते सीएसटी साधारणपणे 1 कोटी लोक दिवसाला रेल्वे प्रवास करतात.वेगवेगळ्या प्रकारच्या अपघात मुंबईकरांचा जीव जातात, रेल्वे क्रॉसिंग, रेल्वे धडकेत मृत्यू तर अतिगर्दीमुळेही रेल्वे आणि रेल्वे परिसरात अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. प्रति दिवशी 11-15 जण रेल्वे अपघातात मरण पावतात,  वर्षाकाठी अडीच ते साडे तीन हजार लोक रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडतात, तर महिन्याला 1 ते 2 हजार प्रवाशी रेल्वे अपघातात जखमी होतात. त्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहराच्या रचनेत बदल करणे गरजेचे त्याची सुरुवात रेल्वे स्टेशनपासून केली पाहिजे 

एका विशिष्ट वेळेला धक्के देत लोक ब्रीजवरुन जातात, क्षमतेपेक्षा अधिक लोक एका पूलावरुन जात असतात, मुंबईचे ब्रीज विशेषत; लोखंडाचे ब्रीज आहे. सागरी किनाऱ्यामुळे लोखंडी ब्रीज गंजण्याचे प्रकार जास्त असतात, त्यामुळे गंजलेल्या अवस्थेत ही ब्रीज असतात. पुलाचे ऑडिट केल्यानंतर अनेक अपघात झाले आहेत, परदेशात अशा प्रकारचे ब्रीज विशिष्ट ठिकाणी असतात, मात्र मुंबईही सागरी किनाऱ्याच्या बाजूला वसलेले शहर आहे त्या दृष्टीने लोखंडी ब्रीज बदलण्याच्या हालचाली प्रशासनाने करणे गरजेचे आहे असं शरद पवारांनी सांगितले. 

गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील टाइम्स ऑफ इंडिया इमारतीला जोडणारा हिमालय पादचारी पूल कोसळला यानंतर हा पूल नेमका कोणाचा आहे यावरुन महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यात टोलवाटोलवी करण्यात आली. नंतर हा पूल आमचाच असल्याची कबुली महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनामुंबईरेल्वेशरद पवार