CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 06:35 IST2025-06-03T06:34:31+5:302025-06-03T06:35:04+5:30

मध्य व हार्बर रेल्वेमार्गावर १७० नवीन बझर

CSMT station now has 'handicapped friendly' facilities; Ticket counter, parking, toilets facilities | CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय

CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मध्य रेल्वेच्याछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आता दिव्यांग फ्रेंडली स्थानक म्हणून विकसित करण्यात येत आहे. येथील शौचालये, तिकीट काउंटर आणि स्थानकात इतर ठिकाणी दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा वाढविण्यात येत असून, ब्रेल लिपीतील दिशा दर्शकसुद्धा बसविण्यात येत आहेत. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत मध्य रेल्वेच्या स्थानकांचा विकास होत असून, या स्थानकांवर दिव्यांगांच्या सुविधांचाही विचार केला जात आहे.

विशेष वाहनांसाठी पार्किंग

सीएसएमटी स्थानकामध्ये दिव्यांगांची गाडी पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, ती ओळखता यावी, यासाठी तिथे आकाशी रंगामध्ये मार्किंग करण्यात आले आहे.

अधिकारी होणार सहायक

दिव्यांग प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी सीएसएमटी स्थानकामध्ये दिव्यांग सहायक म्हणून वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे.

या आहेत विशेष सुविधा

मध्य रेल्वेच्या महत्वाच्या स्थानकांवर दिव्यांग टॉयलेट्समध्ये सुविधेसाठी रेलिंग लावण्यात आली आहे. तसेच, ऑक्युपन्सी लाइटदेखील बसविण्यात आली आहेत.

मध्य व हार्बर रेल्वेमार्गावर १७० नवीन बझर

येथे कमी उंचीचे अतिरिक्त बुकिंग काउंटर बनवले जात आहेत. या तिकीट काउंटरवर सहजगत्या पोहचता यावे, यासाठी दिशादर्शक स्पर्शमार्ग बनविण्यात येत आहेत. तसेच त्यांच्यासाठी विशेष पादचारी पूल आणि लिफ्टची व्यवस्था उभारली जात आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर एकूण १७० नवीन बझर बसवण्यात आले असून, हे बझर दृष्टिहीन व्यक्तींना दिव्यांग डब्यात चढण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत.

Web Title: CSMT station now has 'handicapped friendly' facilities; Ticket counter, parking, toilets facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.