सीएसएमटी-खोपोली शेवटची लोकल १०.२८ ला; खोपोली-कर्जत दरम्यान ६ दिवस मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 09:47 IST2023-12-23T09:47:34+5:302023-12-23T09:47:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मध्य रेल्वेच्या पळसदरी ते खोपोलीदरम्यान पायाभूत सुविधांच्या कामासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून २९ डिसेंबरपर्यंत दररोज रात्री ...

CSMT-Khopoli last local at 10.28; 6 days megablock between Khopoli-Karjat | सीएसएमटी-खोपोली शेवटची लोकल १०.२८ ला; खोपोली-कर्जत दरम्यान ६ दिवस मेगाब्लॉक

सीएसएमटी-खोपोली शेवटची लोकल १०.२८ ला; खोपोली-कर्जत दरम्यान ६ दिवस मेगाब्लॉक

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेच्या पळसदरी ते खोपोलीदरम्यान पायाभूत सुविधांच्या कामासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून २९ डिसेंबरपर्यंत दररोज रात्री तीन तासांचा वाहतूक मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे रात्री साडेबाराची खोपोली-कर्जत लोकल सहा दिवस रद्द असणार आहे. तर सीएसएमटी स्थानकावरून सुटणाऱ्या काही खोपोली लोकल कर्जत स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पळसदरी ते खोपोली दरम्यान लोकलसह मेल- एक्स्प्रेस गाड्यांचा अतिरिक्त वेग वाढवण्यासाठी पायभूत सुविधांची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार शनिवारी- रविवारी मध्यरात्रीपासून पुढील सहा दिवस अर्थात २९ डिसेंबरपर्यंत दररोज मध्यरात्री १.२५ ते पहाटे ४.२५ वाजेपर्यंत विशेष वाहतूक मेगाब्लॉक असणार आहे. 

 खोपोलीहून सुटणारी रात्री १२.३० ची खोपोली-कर्जत लोकल सहा दिवस रद्द असणार आहे. 
 सीएसएमटी स्थानकातून सुटणारी रात्री ११.१८ वाजेची सीएसएमटी- खोपोली लोकल सहा दिवस कर्जतपर्यंत धावणार आहे. 
 आजपासून खोपोलीसाठी सीएसएमटी स्थानकावरून शेवटची लोकल रात्री १०.२८ वाजता सुटणार आहे. त्यामुळे सीएसएमटी ते खोपोली दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढील सहा दिवस लोकल पकडण्यासाठी कार्यालयातून लवकर निघावे लागणार आहे.

Web Title: CSMT-Khopoli last local at 10.28; 6 days megablock between Khopoli-Karjat

टॅग्स :localलोकल