Join us

महिलांवर शेरेबाजी, पाणी उडविणाऱ्यांची खैर नाही...;दहीहंडीनिमित्त पोलिसांचा कारवाईचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 12:16 IST

या दहीहंडीच्या उत्सवात साध्या गणवेशातील पोलिस गर्दीत सहभागी होत सर्व घटनांवर लक्ष ठेवणार आहे.

मुंबई : दहीहंडीला महिलांना पाहून अश्लील टिप्पणी करण्याबरोबरच, पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, फुगे उडविणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे. साध्या गणवेशातील पोलिसांचा सर्व घडामोडींवर वॉच असणार आहे. दहिहंडीच्या उत्सवासाठी सरकारने घातलेल्या अटी, नियमांचे उल्लंघन न करण्याच्या सूचना देत, गोविंदांना सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच या दहीहंडीच्या उत्सवात साध्या गणवेशातील पोलिस गर्दीत सहभागी होत सर्व घटनांवर लक्ष ठेवणार आहे.

दहीहंडीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार असून, शहरातील तब्बल ५ हजार सीसीटीव्ही कॅमऱ्यांसह वॉच टॉवरच्या मदतीने पोलिस सर्व हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत. तसेच मुंबई पोलिस दलातील अधिकारी आणि जवानांसह केंद्रीय व राज्य राखीव बल, दंगल नियंत्रण पथक, राज्य दहशतवाद विरोधी दल (एटीएस), शिघ्रकृती दल, फोर्सवन, बॉम्ब शोधक पथक तैनात आहेत.

साध्या गणवेशातील पोलिसांचा सहभाग

दहीहंडीला सार्वजनिक ठिकाणी १ अंधाधुंदपणे रंगीत पाणी फेकणे, अश्लील बोलणे यांमुळे जातीय तणाव आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असते. २ सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातू | पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील टीका टिप्पणी, गैरवर्तन तसेच पादचायांवर रंगीत पाणी, रंग फेकण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या गणवेशातील पोलिस गर्दीत सहभागी होणार आहे. तसेच त्यांच्यासाठी विशेष पथकाची नेमणूकही करण्यात आली आहे.

टॅग्स :दहीहंडीपोलिस