Join us
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही, उद्धव ठाकरेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 05:12 IST

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी हिंगोलीच्या सभेत बोलताना फडणवीस यांना टोला लगावला होता.

मुंबई : मुख्यमंत्रिपद  गेल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे थांबवले नाही तर भाजपचे  कार्यकर्ते कृतीने उत्तर देतील,  असा इशारा भाजपचे नेते आ. प्रवीण दरेकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी हिंगोलीच्या सभेत बोलताना फडणवीस यांना टोला लगावला होता. तसेच फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरूनही ठाकरे यांनी टीका केली होती. फडणवीस राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी जपान दौऱ्यावर गेले होते. तुम्ही  आरामासाठी परदेशात गेला होता.  सत्ता हातून गेल्याच्या वैफल्यातून  भ्रमिष्ट झाल्यानेच ते बाष्कळ आरोप करत आहेत, असेही दरेकर म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसप्रवीण दरेकर