आर दक्षिणच्या सहायक अभियंत्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:06 IST2021-06-23T04:06:13+5:302021-06-23T04:06:13+5:30

मुंबई : चहामध्ये गुंगीचे औषध मिसळून विवस्त्र अवस्थेत व्हिडिओ तयार केला आणि त्याचा गैरफायदा घेत चार वर्षे लैंगिक अत्याचार ...

Crime of sexual harassment against R South Assistant Engineer | आर दक्षिणच्या सहायक अभियंत्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

आर दक्षिणच्या सहायक अभियंत्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

मुंबई : चहामध्ये गुंगीचे औषध मिसळून विवस्त्र अवस्थेत व्हिडिओ तयार केला आणि त्याचा गैरफायदा घेत चार वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका ३३ वर्षीय महिलेने पालिकेच्या अभियंत्यावर केला आहे. अमोल मेश्राम असे त्याचे नाव असून तो आर दक्षिण विभागाच्या स्थापत्य विभागात कार्यरत आहे. याप्रकरणी समता नगर पोलिसात गुन्हा दाखल।करण्यात आला असून चौकशी सुरू आहे.

फिर्यादी महिला सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करते. मेश्राम याने त्याच्या कांदिवली येथील असल्याकारणाने आरोपी नामे घरात तिला २०१८ साली बोलावत तिच्या चहामध्ये गुंगीचे औषध मिसळले आणि त्यानंतर तिला विवस्त्र करत त्याचे व्हिडिओ शूट केले. हे शूट आणि आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर गेली चार वर्षे लैंगिक अत्याचार केला असा आरोप तिने केला आहे. याप्रकरणी अखेर तिने तक्रार दिल्यानंतर २१ जून, २०२१ रोजी समतानगर पोलिसांनी याप्रकरणी मेश्राम याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crime of sexual harassment against R South Assistant Engineer