Join us
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: घरात एकटी होती महिला, पार्सल देताना डिलिव्हरी बॉय काढू लागला व्हिडीओ, केला विरोध, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 15:50 IST

Crime News: मुंबईतील खार परिसरातील एका सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेसोबत एका डिलिव्हरी बॉयने छेडछाड केल्याचे समोर आले आहे. या महिलेने या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीला मुंब्रा येथून अटक केले आहे.

मुंबई - एका कोरियन युट्यूबर महिलेची छेड काढल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका महिलेची धक्कादायक प्रकारे छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील खार परिसरातील एका सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेसोबत एका डिलिव्हरी बॉयने छेडछाड केल्याचे समोर आले आहे. या महिलेने या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीला मुंब्रा येथून अटक केले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला ही घरी एकटी होती. तसेच तिने काही सामान मागवले होते. दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास या महिलेने काही भाज्या मागवल्या होत्या. त्यानंतर एक डिलिव्हरी बॉय महिलेच्या घरी आला. यादरम्यान जेव्हा ही महिला सामानाचे पैसे देत होती. तेव्हा डिलिव्हरी बॉयने तिचा व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. जेव्हा या महिलेने व्हिडीओ काढण्यास विरोध केला तेव्हा हा डिलिव्हरी बॉय घरात घुसला. त्याने महिलेला धक्काबुक्की आणि मारहाण केली. तसेच तिच्याबद्दल अपशब्द उच्चारले. तसेच या डिलिव्हरी बॉयने घरातून बाहेर पडण्यास नकार दिल्यावर महिलेने बिल्डिंगच्या सिक्युरिटी गार्डला फोन केला.

दरम्यान, गुरुवारी एका महिलेने पोलिकांकडे तक्रार केली. त्यानंतर त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आयोपीविरोधात भादंवि कलम ३५४ आणि ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला शुक्रवारी कोर्टात हजर केले असता शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, संबंधित फूड डिलिव्हरी कंपनीनेही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे.  

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई