Join us

Crime News: मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्याच्या मुलीसमोर हस्तमैथुन, पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 12:37 IST

Crime News: मंत्रालयातील एका  उच्च स्तरीय अधिकाऱ्याच्या मुलीसमोर एका माथेफिरूने  हस्तमैथुन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

- मनिषा म्हात्रेमंत्रालयातील एका  उच्च स्तरीय अधिकाऱ्याच्या मुलीसमोर एका माथेफिरूने  हस्तमैथुन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित माथेफिरू आरोपीला ताडदेव पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी रात्री रेसकोर्सजवळील गव्हर्मेंट कॉलनीजवळ हा धक्कादायक प्रकार घडला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गाडीत बसलेल्या आरोपीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने २२ वर्षीय मुलीला जवळ बोलावले. त्यानंतर तिच्यासमोर हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. याबाबत संशय येताच मुलीने मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. तसेच आरडाओरडा केला. त्यामुळे गांगरलेल्या आरोपीने तिथून पळ काढला.

दरम्यान, सदर मुलीने काढलेल्या व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. अब्दुल अहमद गौस मोहम्मद रहिनी असे या २३ वर्षीय आरोपीचे नाव आहे. त्याला अंधेरी येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सदर आरोपी कार सर्व्हिस सेंटरमध्ये कामाला असल्याची माहिती मिळाली आहे. आज या आरोपीला गिरगाव कोर्टात हजर करण्यात येत आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीलैंगिक छळ