Crime: मुंबईतील ग्रँडरोडमध्ये भीषण हत्याकांड, पत्नी सोडून गेल्याच्या रागाने माथेफिरूचा शेजाऱ्यांवर हल्ला, दोन जणांचा मृत्यू 

By मनीषा म्हात्रे | Updated: March 24, 2023 19:24 IST2023-03-24T19:23:55+5:302023-03-24T19:24:17+5:30

Mumbai: मुंबईतील ग्रँटरोड परिसरातील पार्वती मेन्शन बिल्डिंगमध्ये भयानक हत्याकांड घडले आहे. पत्नी सोडून गेल्याच्या रागातून एका माथेफिरूने शेजारच्या पाच जणांवर केलेल्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

Crime: Horrific murder in Mumbai's Grand Road, Mathefiru attacked neighbors in anger over his wife's desertion, two killed | Crime: मुंबईतील ग्रँडरोडमध्ये भीषण हत्याकांड, पत्नी सोडून गेल्याच्या रागाने माथेफिरूचा शेजाऱ्यांवर हल्ला, दोन जणांचा मृत्यू 

Crime: मुंबईतील ग्रँडरोडमध्ये भीषण हत्याकांड, पत्नी सोडून गेल्याच्या रागाने माथेफिरूचा शेजाऱ्यांवर हल्ला, दोन जणांचा मृत्यू 

- मनिषा म्हात्रे 
मुंबई - मुंबईतील ग्रँटरोड परिसरातील पार्वती मेन्शन बिल्डिंगमध्ये भयानक हत्याकांड घडले आहे. पत्नी सोडून गेल्याच्या रागातून एका माथेफिरूने शेजारच्या पाच जणांवर केलेल्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.

ग्रँट रोड येथील पार्वती मेन्शन या इमारतीमधील  दुसऱ्या मजल्यावर दुपारी तीन ते चारच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीने रागाच्या भरात पुढे येणाऱ्या सर्वावर हल्ला चढवला, यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी चेतनला ताब्यात घेतले आहे. आरोपी चेतन याची पत्नी दोन महिन्यांपूर्वी घर सोडून गेली. शेजारच्या लोकांमुळे पत्नी सोडून गेल्याचा राग त्याच्या मनात होता. त्यातूनच हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. स्वतःचे कुटुंब सोडून गेल्यामुळे आरोपीने मानसिक तणावामुळे आणि रागाच्या भरात या व्यक्तींवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यातील गंभीर जखमींची नावे प्रकाश वाघमारे, जेनील भ्रमभट्ट ..स्नेहल भ्रमभट्ट, जयंद्र मेस्त्री, इला मेस्त्री, अशी असून, त्यांच्या पैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.  

Web Title: Crime: Horrific murder in Mumbai's Grand Road, Mathefiru attacked neighbors in anger over his wife's desertion, two killed