मालकाच्या तिजोरीवर डल्ला मारत 'पुष्पा' पसार; दहिसर पोलिसात गुन्हा दाखल

By गौरी टेंबकर | Published: June 14, 2024 05:35 PM2024-06-14T17:35:59+5:302024-06-14T17:36:26+5:30

दहिसर पोलिसांच्या हद्दीत घडल्यानंतर घरमालकाने या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

crime has been registered in Dahisar police | मालकाच्या तिजोरीवर डल्ला मारत 'पुष्पा' पसार; दहिसर पोलिसात गुन्हा दाखल

मालकाच्या तिजोरीवर डल्ला मारत 'पुष्पा' पसार; दहिसर पोलिसात गुन्हा दाखल

मुंबई: घर कामासाठी आणलेला नेपाळी नोकर पुष्पा बेहेरे याने लाखोंचा डल्ला मारत पळ काढला. हा प्रकार दहिसर पोलिसांच्या हद्दीत घडल्यानंतर घरमालकाने या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

तक्रारदार मनीष चिरावावाला (५७) हे गेल्या तीन वर्षापासून आजारी असल्याने त्यांनी स्वतःच्या देखभालीसाठी दोन नोकर ठेवले होते. त्यातील पुष्पा बेहेरे हा २४ तास त्यांच्या घरी राहत होता. तसेच त्यांची सेवा करून ते झोपल्यानंतर तो देखील त्यांच्या बेडरूममध्येच झोपत होता. विविध आजारांवर मनीष हे उपचार घेत असल्याने इमर्जन्सी करिता बेडरूम मधील ड्रॉवरमध्ये त्यांनी अडीच ते तीन लाख रुपये रोख आणून ठेवली होती.

नेहमीप्रमाणे ते ११ जून रोजी रात्री ११ वाजता झोपले त्यानंतर पुष्पाही झोपी गेला. मात्र पहाटे ३ वाजता त्यांना जाग आल्याने स्वच्छतागृहात जाण्यासाठी त्यांनी पुष्पाला आवाज दिला. मात्र तो मदतीला आलाच नाही त्यामुळे मनीष हे पुष्पा झोपलेल्या ठिकाणी आले. त्यांनी ब्लॅंकेट उचलून पाहिल्यावर त्याखाली उशा लावलेल्या त्यांना दिसल्या त्यावेळी त्यांना संशय आला. म्हणून त्यांनी ड्रॉवरमध्ये ठेवलेली रक्कम तपासून पाहिली. तेव्हा त्यातील अडीच लाख रुपये चोरीला गेले होते. तसेच पुष्पा हा देखील तिथून गायब झाला होता. त्यामुळे पुष्पानेच ही चोरी केल्याचे उघड झाले आणि मनीष यांनी त्याच्या विरोधात पोलिसात धाव घेतली.

Web Title: crime has been registered in Dahisar police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.