प्रताप सरनाईकांकडे पाकिस्तानी नागरिकाचे क्रेडिट कार्ड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:24 IST2020-12-13T04:24:17+5:302020-12-13T04:24:17+5:30

ईडीकडून पुन्हा समन्स : उद्या होणार चौकशी प्रताप सरनाईकांकडे पाकिस्तानी नागरिकाचे क्रेडिट कार्ड? ईडीकडून पुन्हा समन्स : उद्या होणार ...

Credit card of Pakistani citizen to Pratap Sarnaik? | प्रताप सरनाईकांकडे पाकिस्तानी नागरिकाचे क्रेडिट कार्ड?

प्रताप सरनाईकांकडे पाकिस्तानी नागरिकाचे क्रेडिट कार्ड?

ईडीकडून पुन्हा समन्स : उद्या होणार चौकशी

प्रताप सरनाईकांकडे पाकिस्तानी नागरिकाचे क्रेडिट कार्ड?

ईडीकडून पुन्हा समन्स : उद्या होणार चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीमुळे चर्चेत आलेल्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कारण त्यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात एका पाकिस्तानी नागरिकाचे क्रेडिट कार्ड सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सिंथिया दाद्रस या नावाच्या व्यक्तीचे हे कॅलिफोर्नियातील फेयरमॉन्ट बँकचे कार्ड असून, त्यावर सरनाईक यांचा पत्ता असल्याचे समजते. याबाबत ईडीने संबंधित बँकेकडून तपशील मागविला असून, सरनाईक यांना सोमवारी चौकशीसाठी हजर रहाण्यासाठी समन्स बजाविल्याचे सूत्रांनी सांगितले. सरनाईक यांनी या कार्डबाबत अद्याप काेणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, टॉप्स सिक्युरिटी ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहाराबद्दल सरनाईक यांची गुरुवारी ईडीने सुमारे साडेसहा तास चौकशी केली होती, तर २४ नोव्हेंबरला छापा टाकला होता. त्यावेळी त्यांचे पुत्र विहंग यांची ५ तास चौकशी केली होती.

.........................

Web Title: Credit card of Pakistani citizen to Pratap Sarnaik?