स्टेट बँकेच्या निषेधात सीपीआयचे आझाद मैदानात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 20:11 IST2024-03-14T20:08:53+5:302024-03-14T20:11:01+5:30
Mumbai News: निवडणूक रोख्यांचा तपशील भारतीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात भारतीय स्टेट बँकेने ( एसबीआय ) विलंब केला. लोकसभा निवडणुकीआधी दात्यांची नावे दिली नाहीत. याचा निषेध करीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्सवादी) मुंबई कमिटीने आझाद मैदानात गुरुवारी आंदोलन केले.

स्टेट बँकेच्या निषेधात सीपीआयचे आझाद मैदानात आंदोलन
- श्रीकांत जाधव
मुंबई - निवडणूक रोख्यांचा तपशील भारतीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात भारतीय स्टेट बँकेने ( एसबीआय ) विलंब केला. लोकसभा निवडणुकीआधी दात्यांची नावे दिली नाहीत. याचा निषेध करीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्सवादी) मुंबई कमिटीने आझाद मैदानात गुरुवारी आंदोलन केले. एसबीआयने आयोगाला सादर केलेला तपशील आयोगाने संकेतस्थळावर जाहीर करावा अशी मागणी सीपीआयने यावेळी केली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. प्रकाश रेड्डी, शेतकरी कामगार पक्षाच्या विद्यार्थी नेत्या साम्या कोयंडे यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. सर्वोच्च न्यायालयाने सरकारी धोरणाच्या पारदर्शकतेच्या नावाखालील अपारदर्शकतेवरच बोट ठेवले आहे. न्यायालयाने १५ फेब्रुवारी रोजी निकाल देताना २०१७ची निवडणूक रोखे योजना गैरकायदेशीर ठरवत रद्द केली. मात्र ही माहिती स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी दडवली आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी कॉ. रेड्डी यांनी केली.