Join us

वर्षा गायकवाड यांच्याविरोधात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवरील निकाल काेर्टाकडून राखीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 06:20 IST

वर्षा गायकवाड मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्याविरोधात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने सोमवारी राखून ठेवला.

वर्षा गायकवाड मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या. गायकवाड यांनी  भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा १६,५१४ मतांनी पराभव केला. मात्र, गायकवाड यांच्या निवडणुकीला असिफ सिद्दिकी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. गायकवाड यांच्या मतदारसंघातून सिद्दिकी यांनी निवडणूक लढवली होती. गायकवाड यांनी वाटलेल्या हँडबिलांमध्ये प्रकाशक आणि मुद्रकाचे नाव छापलेले नाही. नियमानुसार, यांची नावे छापणे आवश्यक आहे, असे याचिकेत म्हटले आहे. मात्र, गायकवाड यांनी ही याचिका दाखल करून घेण्यास आक्षेप घेतला.  आरोपांच्या पुष्ट्यर्थ पुरेसे पुरावे नसल्याचे गायकवाड यांनी म्हटले.

सिद्दिकी यांनी वर्षा गायकवाड यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. गायकवाड यांना मत देण्यासाठी विद्यमान आमदाराने मतदारांना पैसे वाटल्याचे व्हिडीओ आहेत, असाही आरोप आहे. त्यावर आक्षेप घेत गायकवाड यांचे वकील तेजस देशमुख यांनी न्यायालयाला सांगितले की, तिथे विद्यमान आमदार अजित पवार गटाचे झिशान सिद्दीकी होते आणि त्यांचा संदर्भ याचिकाकर्ते देत आहेत. तसेच पैसे वाटल्याचे व्हिडीओ याचिकेला जोडण्यात आले नाहीत.  

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४ निकालवर्षा गायकवाडनिवडणूक 2024न्यायालय