‘गनिंग फॉर द गॉडमॅन’ हे पुस्तक प्रकाशित करण्यास कोर्टाची मनाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 04:16 AM2020-09-05T04:16:01+5:302020-09-05T04:16:31+5:30

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एस. मीना यांनी शुक्रवारी संचिता गुप्ता यांना अंतरिम दिलासा देत या पुस्तकाच्या प्रकाशनास मनाई केली.

Court refuses to publish Gunning for the Godman | ‘गनिंग फॉर द गॉडमॅन’ हे पुस्तक प्रकाशित करण्यास कोर्टाची मनाई

‘गनिंग फॉर द गॉडमॅन’ हे पुस्तक प्रकाशित करण्यास कोर्टाची मनाई

Next

नवी दिल्ली : पटियाला हाऊस कोर्टाने ‘गनिंग फॉर द गॉडमॅन : द ट्रू स्टोरी बिहार्इंड द आसाराम बापू कन्व्हिक्शन’ हे पुस्तक प्रकाशित करण्यास प्रतिवादीला पुढच्या सुनावणीपर्यंत मनाई केली आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एस. मीना यांनी शुक्रवारी संचिता गुप्ता यांना अंतरिम दिलासा देत या पुस्तकाच्या प्रकाशनास मनाई केली.
आसाराम बापू यांच्याशी संबंधित प्रकरणात संचिता सह-आरोपी आहेत. वेब पोर्टलवर प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकातील एक प्रकरण माझी बदनामी करणारे आहे. तसेच माझे अपील राजस्थान हायकोर्टात प्रलंबित असल्याने माझ्याविषयी पूर्वग्रह दूषित होऊ शकतो, असे स्पष्ट करीत संचिताने कोर्टात धाव घेतली होती. हार्पर कॉलिन्स प्रकाशनातर्फे ५ सप्टेंबर २०२० रोजी हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार होते. जयपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि संजीव माथूर हे या पुस्तकाचे लेखक आहेत.

Web Title: Court refuses to publish Gunning for the Godman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.