राहुल गांधी, सीताराम येचुरी यांचे खटल्यातून नाव वगळण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 06:28 AM2019-11-24T06:28:43+5:302019-11-24T07:10:51+5:30

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्याविरोधात माझगाव न्यायालयात बदनामीचा खटला चालवण्यात येणार आहे.

Court refuse to be excluded Rahul Gandhi, Sitaram Yechury from the case | राहुल गांधी, सीताराम येचुरी यांचे खटल्यातून नाव वगळण्यास नकार

राहुल गांधी, सीताराम येचुरी यांचे खटल्यातून नाव वगळण्यास नकार

Next

मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्याविरोधात माझगाव न्यायालयात बदनामीचा खटला चालवण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. संघ स्वयंसेवक अ‍ॅड. धृतीमान जोशी यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. या खटल्याच्या आरोपपत्रातून नाव वगळावे, अशी विनंती राहुल गांधी व सीताराम  येचुरी यांच्यातर्फे करण्यात आली होती. ती शनिवारी न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे त्यांच्याविरोधात आता खटला चालवण्यात येणार आहे.

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची २०१७ मध्ये बंगळुरूमध्ये हत्या झाली होती. राहुल गांधी यांनी जुलै महिन्यात न्यायालयासमोर आपण या बदनामीच्या खटल्यात दोषी नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांची १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर माझगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मुक्तता केली होती.

Web Title: Court refuse to be excluded Rahul Gandhi, Sitaram Yechury from the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.