आर्यन खानला कोर्टाचा दिलासा, विशेष न्यायालयानं पासपोर्ट केला परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 06:55 IST2022-07-14T06:55:24+5:302022-07-14T06:55:48+5:30

क्रूझ ड्रग्स प्रकरणी एनसीबीने मेमध्ये आर्यनला क्लीनचिट दिली.

Court reassures Aryan Khan special court returns passport drug case ncb | आर्यन खानला कोर्टाचा दिलासा, विशेष न्यायालयानं पासपोर्ट केला परत

आर्यन खानला कोर्टाचा दिलासा, विशेष न्यायालयानं पासपोर्ट केला परत

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा पासपोर्ट विशेष न्यायालयाने परत केला. त्यामुळे आता आर्यन परदेशात प्रवास करू शकतो. पासपोर्टसाठी आर्यनने विशेष एनडीपीएस न्यायालयात अर्ज केला होता. क्रूझ ड्रग्स प्रकरणी एनसीबीने मेमध्ये आर्यनला क्लीनचिट दिली. २७ मेला एनसीबीने १४ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यातून आर्यनचे नाव वगळण्यात आले.

''तपासादरम्यान कोणताही पुरावा समोर न आल्याने अर्जदारासह सहा जणांविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. तसेच एनसीबी एसआयटीने कोणताही आक्षेप न घेतल्याने जामीन रोखे रद्द करण्याच्या व पासपोर्ट परत करण्याची विनंती मान्य करायला हवे, असे न्यायालयाने म्हटले.

Web Title: Court reassures Aryan Khan special court returns passport drug case ncb