राहूल गांधी, येचुरी यांना न्यायालयाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 06:43 AM2019-04-03T06:43:17+5:302019-04-03T06:43:43+5:30

संघाची बदनामी केल्याचे प्रकरण : एक रुपयाचा मानहानीचा दावा

Court notice to Rahul Gandhi, Yechury | राहूल गांधी, येचुरी यांना न्यायालयाची नोटीस

राहूल गांधी, येचुरी यांना न्यायालयाची नोटीस

googlenewsNext

ठाणे: ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या गंभीर आरोपांवर आक्षेप घेणाऱ्या याचिकेसंदर्भात ठाणे न्यायालयाने सोमवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांना ३0 एप्रिल रोजी हजर राहण्याची नोटीस बजावली. दोन्ही नेत्यांवर याचिकाकर्त्याने एक रूपयाचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी हत्या केली गेली.दुसऱ्या दिवशी, ६ सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात कुणी बोलले तर असेच मारले जाते, असे वक्तव्य केले होते. याचदरम्यान येचुरी यांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केले होते. याविरोधात ठाण्यातील याचिकाकर्ते विवेक चंपानेरकर यांनी गांधी आणि येचुरी यांच्यावर एक रुपयाचा मानहाणीचा दावा दाखल केला होता. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरूद्ध बोलण्यास मनाई करावी, अशी मागणीही याचिकाकर्त्याने केली होती. तो दावा पटलावर आल्यावर ठाणे दिवाणी न्यायालयाचे न्यायाधिश भाटिया यांनी गांधी आणि येचुरी यांना ३० एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावल्याची माहिती याचिकाकर्त्याचे वकील आदित्य मिश्रा यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: Court notice to Rahul Gandhi, Yechury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.