खडसेंना काेर्टाचा दणका, भाेसरी भूखंड घाेटाळाप्रकरणी आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 05:32 IST2025-12-11T05:30:54+5:302025-12-11T05:32:31+5:30
विशिष्ट भूखंडाच्या संपादनाबाबत बैठक बोलावणे आणि अधिका-यांना ‘भरपाई द्या किंवा जमीन परत करा’ अशा सूचना देणे, हा विषय त्यांच्या खात्याशी संबंधित नव्हता. त्यांचा हा निर्णय सार्वजनिक हितासाठी नसून व्यक्तिगत फायद्यासाठी असल्याचे प्रथमदर्शनी आढळते, असे निरीक्षण न्यायमूर्ती सत्यनारायण नावंडर यांनी नोंदविले.

खडसेंना काेर्टाचा दणका, भाेसरी भूखंड घाेटाळाप्रकरणी आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला
मुंबई : पुण्यातील भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी मंत्री एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी दाखल केलेला आरोपमुक्ततेचा अर्ज विशेष लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाने गेल्या आठवड्यात फेटाळला.
महसूलमंत्री म्हणून एकनाथ खडसे यांच्याकडे सार्वजनिक हिताचे रक्षण करण्याचे व सार्वजनिक हितासाठी निर्णय घेण्याचे अधिकार होते. परंतु, हे अधिकार स्वत:साठी किंवा कुटुंबियांसाठी आर्थिक किंवा अनुचित फायदा मिळवण्यासाठी वापरणे अपेक्षित नव्हते. विशिष्ट भूखंडाच्या संपादनाबाबत बैठक बोलावणे आणि अधिका-यांना ‘भरपाई द्या किंवा जमीन परत करा’ अशा सूचना देणे, हा विषय त्यांच्या खात्याशी संबंधित नव्हता. त्यांचा हा निर्णय सार्वजनिक हितासाठी नसून व्यक्तिगत फायद्यासाठी असल्याचे प्रथमदर्शनी आढळते, असे निरीक्षण न्यायमूर्ती सत्यनारायण नावंडर यांनी नोंदविले.