आ. सुर्वेंविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप न्यायालयाने फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 12:56 IST2025-08-05T12:55:54+5:302025-08-05T12:56:39+5:30
लाचखोरी, पत्रके वाटणे, आचारसंहितेचा भंग करणे आणि एक कोटी रुपयांचे सामुदायिक सभागृह उभारण्याच्या आश्वासनाद्वारे मतदारांना प्रलोभन देणे यांचा समावेश आहे.

आ. सुर्वेंविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप न्यायालयाने फेटाळले
मुंबई : मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिंदेसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याविरुद्ध दाखल केलेली निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. याचिकेत कारवाई करण्याचे वैध कारण नाही तसेच याचिकेत तथ्यही नाही, असे न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले.
उद्धव ठाकरे गटाचे उदेश पाटेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेत, सुर्वे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्टाचार पद्धतीचा अवलंब केला.
लाचखोरी, पत्रके वाटणे, आचारसंहितेचा भंग करणे आणि एक कोटी रुपयांचे सामुदायिक सभागृह उभारण्याच्या आश्वासनाद्वारे मतदारांना प्रलोभन देणे यांचा समावेश आहे. ‘भ्रष्टाचाराचे आरोप केवळ गंभीर नाहीत तर कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे म्हणून भ्रष्टाचाराचे आरोप सहजपणे करता येत नाही. कायद्यातील तरतुदींचे काटेकोपरणे पालन करणे बंधनकारक आहे,’ असे न्या. संदीप मारणे यांच्या एकल पीठाने म्हटले.
काय म्हणाले न्यायालय?
याचिकादाराने भ्रष्टाचाराच्या आरोपाचे समर्थन करण्यासाठी चार व्हिडीओ सादर केल्याचे सांगितले, तरी प्रत्यक्षात न्यायालयात पुरावे जेपीजी आणि एमपीफोर फॉरमॅटमध्ये फाईल्स सादर केल्या. याचिकाकर्त्यांचा दृष्टिकोन याचिकांच्या कठोर आवश्यकता पूर्ण करत नाही. व्हिडीओ रेकॉर्डिंगशी संबंधित योग्य आणि आवश्यक युक्तिवाद करण्यात अपयशी ठरले, असे न्यायालयाने म्हटले.
संमती, षड् यंत्रसारख्या शब्दांचा वापर
सुर्वे यांच्यावर केलेले आरोप अस्पष्ट आहेत आणि सुर्वे यांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. सुर्वे यांच्या कृत्यामुळे निवडणूक निकालावर कसा परिणाम झाला, हे स्पष्ट करण्यात याचिकादार अयशस्वी झाले. तथ्यांना आधार न देता ‘संमती’ आणि षड् यंत्रसारख्या शब्दांचा केवळ वापर करण्यात आला आहे, असे न्यायालयाने म्हटले.