कचरा वर्गीकरण मोहिमेला हरताळ, नगरसेवकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 03:17 AM2020-01-23T03:17:00+5:302020-01-23T03:17:24+5:30

स्वच्छता सर्वेक्षणात गेल्या वर्षी इंदौर शहराने जागतिक दर्जाच्या मुंबईला मागे टाकले होते.

Councilors accused of garbage collection campaign | कचरा वर्गीकरण मोहिमेला हरताळ, नगरसेवकांचा आरोप

कचरा वर्गीकरण मोहिमेला हरताळ, नगरसेवकांचा आरोप

Next

मुंबई : स्वच्छता सर्वेक्षणात गेल्या वर्षी इंदौर शहराने जागतिक दर्जाच्या मुंबईला मागे टाकले होते. मुंबईत मात्र घराघरात वेगळा करण्यात आलेला सुका आणि ओला कचरा पालिकेच्या वाहनांमध्ये एकत्रच उचलला जात आहे. त्यामुळे आपल्या प्रभागातील नागरिकांना कचरा वर्गीकरणासाठी प्रोत्साहन द्यायचे कसे, असा सवाल सर्वपक्षीय सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला. इंदौरसारख्या छोट्या शहराकडून मुंबई महापालिकेने स्वच्छतेचे धडे घ्यावेत, असा सल्ला सदस्यांनी दिला.
मुंबईतील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना सुका व ओला कचरा वेगळा करण्याची सक्ती करण्यात येत आहे. त्यानुसार अनेक सोसायट्यांनी आपल्या आवारात कचरा वेगळा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र हा कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या पालिकेच्या वाहनातून ओला, सुका, ई कचरा एकत्रच नेला जातो. त्यामुळे या मोहिमेलाच हरताळ फसला जात असल्याची नाराजी सदस्यांनी स्थायी समितीमध्ये व्यक्त केली.
स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी महापालिका कचरा उचलणाºया वाहनांवर ध्वनिक्षेपक बसविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये प्रशासनाने मंजुरीसाठी मांडला होता. भाजपच्या ज्योती अळवणी, शिवसेनेचे संजय घाडी, राजुल पटेल यांनी पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. इंदौरसारख्या शहराकडून पालिकेने धडे घ्यावेत, असा टोला सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी लगावला.

यांत्रिक झाडूची सफाई फेल

महापालिकेने मुंबईत सफाईसाठी यांत्रिक झाडू आणला. मात्र या झाडूने रस्ते साफ होत नाहीत. त्यामुळे या सफाईसाठी खर्च करण्यात येणारे ९८ कोटी रुपये वाया गेले असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला. यांत्रिक झाडूचे वाहन सुरू केल्यानंतर रस्त्यांवर केवळ धूळ उडते. त्यामुळे अशी सफाई तत्काळ बंद करून पालिकेच्या पैशांची बचत करावी, अशी सूचना त्यांनी केली.

Web Title: Councilors accused of garbage collection campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई