Join us

स्वतः गाडी चालवत नगरसेविकेने महापालिका अधिकाऱ्यांना घडवली खड्डे सफर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 00:00 IST

गणरायाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर असतानाही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येत आहे.

ठळक मुद्देगणरायाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर असतानाही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येत आहे.

मुंबई : गणपती बाप्पाचे आगमन ३ दिवसांवर येऊन ठेपले आहे. असे असताना वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा मुंबई महानगर पालिकेचे रस्ते विभागाचे अधिकारी सुस्त आणि नागरिक त्रस्त अशी स्थिती आहे. खड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

त्यामुळे चक्क मंगळवारी भाजपाच्या प्रभाग क्रमांक 52 च्या नगरसेविका प्रीती सातम यांनी गांधीगिरी केली. चक्क पालिकेच्या संबंधित अधिकारी वर्गाला सोबत घेऊन आणि स्वतः गाडी चालवत खड्ड्या मुळे होणारा त्रास काय आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची विनंती केली.

पुढील २ दिवसात सर्व खड्डे भरून रस्ते पूर्ववत केले जातील असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. जर रस्ते पूर्ववत नाही झाले तर मग याच खड्ड्यात आंदोलन करू असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. यावेळी सहाय्यक अभियंता परिरक्षण विभागाचे प्रकाश तांबे, दुय्यम अभियंता परिरक्षण विभागाचे श्रीरंग धर्माधिकारी, रस्ते अभियंता परिरक्षण विभागाच्या निशा दळवी आणि कनिष्ठ अभियंता परिरक्षण विभागाचे दत्ता येडले आदी अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिकागणेशोत्सव