कॉर्पोरेट जग बोलायला घाबरते- राहुल बजाज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 01:07 AM2019-12-01T01:07:21+5:302019-12-01T01:07:37+5:30

मुंबईत उद्योग जगतातील एका प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. या सोहळ्यात मुख्य भाषणानंतर उपस्थितांच्या प्रश्नांना सर्व मंत्र्यांनी उत्तरे दिली.

The corporate world is afraid to speak - Rahul Bajaj | कॉर्पोरेट जग बोलायला घाबरते- राहुल बजाज

कॉर्पोरेट जग बोलायला घाबरते- राहुल बजाज

googlenewsNext

मुंबई : देशात असहिष्णुतेचे वातावरण आहे. त्यावर काही बोलले, टीका केली तर ती योग्य पद्धतीने घेतली जाणार नाही, अशी भीती कॉर्पोरेट जगताला वाटते. या सर्व परिस्थितीवर आपण मात करायला हवी, असे उद्गार ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनी मुंबईत शनिवारी झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात काढले. त्यावर उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वाधिक टीका आमच्यावर झालेली आहे. त्यामुळे कोणीही घाबरायची गरज नाही. हे सरकार अत्यंत पारदर्शीपणे काम करत आहे, असे स्पष्ट केले.
मुंबईत उद्योग जगतातील एका प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. या सोहळ्यात मुख्य भाषणानंतर उपस्थितांच्या प्रश्नांना सर्व मंत्र्यांनी उत्तरे दिली.
आपल्याला कोणताही प्रश्न विचारायचा नाही, पण एक परिस्थिती मांडायची आहे, असे म्हणत राहुल बजाज यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. मी जन्मत:च व्यवस्थाविरोधी आहे. आपल्याला आवडणार नाही तरी सांगतो की, माझे राहुल हे नाव जवाहरलाल नेहरू यांनी ठेवले आहे. अशी प्रस्तावना करत बजाज यांनी नथुराम गोडसे याचा देशभक्त असा उल्लेख झाल्याचा संदर्भ देत खंत व्यक्त केली. त्यावर अमित शहा यांनी, साध्वी प्रज्ञासिंह यांनी याबद्दल खुलासा केला असून संसदेत माफीदेखील मागितली आहे, असे स्पष्ट केले आहे.
यूपीए दोनच्या काळात सरकारवर आम्ही काहीही टीका करत होतो. पण आता तशी परिस्थिती नाही. सरकारवर केलेली टीका योग्य अर्थाने घेतली जाणार नाही, अशी भीती कॉर्पोरेट जगाला वाटते, हे कोणी बोलून दाखवणार नाही, पण मी सांगतो, असे बजाज म्हणाले. त्यावर शहा यांनी कोणीही टीका करायला घाबरू नये. तशी काही परिस्थिती नाही, असा खुलासा केला.

Web Title: The corporate world is afraid to speak - Rahul Bajaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई