Corono Virus : धडे घेत उभ्या राहिलेल्या धारावी मॉड्यूलचा जगभरात डंका 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 02:54 PM2020-08-09T14:54:10+5:302020-08-09T14:56:07+5:30

अनेकांना वाटले की कोरोनामळे  भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी उध्वस्त होईल.

Corono Virus: Dharavi module, which has been taking lessons, has spread all over the world | Corono Virus : धडे घेत उभ्या राहिलेल्या धारावी मॉड्यूलचा जगभरात डंका 

Corono Virus : धडे घेत उभ्या राहिलेल्या धारावी मॉड्यूलचा जगभरात डंका 

Next

मुंबई : अरुंद रस्ते, गर्दी असलेली घरे, कमी खर्चात आरोग्य सेवा आणि कमकुवत स्वच्छता यामुळे अनेकांना वाटले की कोरोनामळे  भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी उध्वस्त होईल. मात्र सुदैवाने तसे झाले नाही. कारण महापालिकेने अत्यंत मेहेनतीने येथील कोरोनाचे समूळ उच्चाटन केले आहे. आणि हे काही एका रात्रीत झाले नाही. धारावी मॉड्यूल एका रात्रीत उभे राहले नाही. धडे घेत उभ्या राहिलेल्या मॉड्यूलने धारावी आज कोरोनामुक्त होत आहे. याचे श्रेय महापालिकेला असून, धारावी मॉड्यूलची दखल ऑस्टेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने देखील घेतली आहे. 

येथील रहिवाशांनी आपल्या कोरोनाच्या कहान्या कथन केल्या असून, कोरोनावर त्यांनी कशी मात केली? हे सांगत घाबरण्याचे कारण नाही, असे म्हटले आहे एकाचवेळी १०० रुग्ण आढळत असतानाच येथे महापालिकेने राबविलेल्या उपक्रमामुळे धारावी कोरोनामुक्त कशी झाली? याचे माहिती रहिवाशांनी प्रसार माध्यमांना दिली. कोरोनाचा समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक धारावीकराचे योगदान महत्त्वाचे असून, आज येथील कोरोनाग्रस्तांची संख्या एका आकड्यावर आली आहे. धारावीकरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणे हादेखील येथील एक महत्त्वाचा घटक असून, आज जगभरात धारावी मॉडयुलकडे आदर्श म्हणून पाहिले जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडहॅनम गेब्रेयेसुस यांनी ज्या देशांनी कोरोना नियंत्रणात उत्तम कामगिरी केली त्यांची उदहारणे देतांना धारावीतील एकात्मिक प्रयत्नांचा आवर्जुन उल्लेख केला होता. तर वॉशिंग्टन पोस्टने भारतातील कोरोना मृत्यूच्या आकडेवारीबाबत लपवाछपती होत असल्याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला होता. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकात्ता येथील मृत्यूबाबतची आकडेवारी मागविण्यात आली होती. याबाबत मुंबई महापालिकेने सर्व अद्ययावत माहिती सादर केली, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले होते.

मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विविध स्तरीय उपायोजना अव्याहतपणे राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने चेस द वायरस आणि ट्रेसिंग – ट्रॅकींग – टेस्टींग – ट्रिटिंग ची चतु:सूत्री या उपाययोजनांचा समावेश आहे. याअंतर्गत बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा अत्यंत प्रभावीपणे शोध घेत संबंधित व्यक्तींचे अलगीकरण करणे, आवश्यकतेनुरुप संशयितांच्या व बाधितांच्या कोरोना विषयक वैद्यकीय चाचण्या करणे आणि लक्षणे असलेल्या बाधितांवर सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार औषधोपचार करणे यासारख्या बाबींचा समावेश आहे.

वैद्यकीय चाचण्या करताना त्याबाबतचा अहवाल २४ तासांच्या आत महापालिकेकडे प्राप्त होईल आणि त्यानंतर महापालिकेच्या स्तरावर सुनिश्चित कार्यपद्धती नुसार अधिकाधिक प्रभावी कार्यवाही करण्यात येत आहे. अभियान पद्धतीने करण्यात येत असलेल्या या कार्यवाहीमुळे बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा प्रभावीपणे शोध घेऊन त्यांचे विलगीकरण व आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्याची कार्यवाही सातत्याने केली जात आहे. चेस द व्हायरस हे सूत्र घेऊन फिव्हर क्लिनीक्सच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांमधून रूग्णांचा शोध घेतला गेला; त्याच धर्तीवर पावसाळी आजारांसाठी काम केले जात आहे. 

मुंबईत ११ मार्च २०२० रोजी कोविडचा पहिला रुग्ण आढळून आला होता. संसर्गजन्यताही तुलनेने अधिक असणा-या या आजाराला प्रतिबंध करणे, हे लोकसंख्येची घनता अधिक असणा-या मुंबईत  मोठे आव्हानच होते व आहे. तथापि, या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाद्वारे सर्वस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देतानाच वैदयकीय उपचार विषयक आवश्यक ती कार्यवाही देखील सातत्यपूर्ण पद्धतीने केली जात आहे. परिणामी कोरोना संसर्गास परिणामकारकरित्या आळा घालणे शक्य होत आहे.

-------------------

मिशन धारावी 

- सर्वसाधारण तापाची लक्षणे दिसली तरी नागरिकांची तपासणी केली जात होती.
- कोरोनाचा रुग्ण आढळल्यास २४ तासांत परिसर, इमारत सील केली जात होती.
- सातत्याने घरे, परिसरांत निर्जंतुकिकरण करण्यात आले.
- कटेनमेंट झोनची निर्मिती करण्यात आली.
- मुंबई महापालिकेकडून अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला.
- पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा देण्यात आल्या.
- ज्या झोपड्यात, परिसरात रुग्ण आढळले; ती झोपडी, परिसर सील करण्यात आला. पुढील ४८ तासांत पुर्ण झोपडपट्टी सील करण्यात आली.
- कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली.
- सार्वजनिक शौचालये सातत्याने साफ करण्यात आली.
- फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
- हायरिस्क झोनमध्ये मुंबई महापालिकेनेच अन्नधान्य, औषधे पुरविली.
- हाय रिक्स झोनमध्ये ताप तपासण्यासाठी शिबीरे घेण्यात आली.
- महापालिकेचे ९ दवाखाने आणि ३५० खासगी दवाखान्यांची मदत घेण्यात आली.
- पीपीई किटस देण्यात आले.
- खासगी डॉक्टर, महापालिका आणि रुग्णालये यांच्या ताळमेळ ठेवण्यात आला.
- डोअर टू डोअर स्क्रिनिंग करण्यात आले.
- कटेनमेंट झोनबाबतचे निश्चित धोरण आखण्यात आले.
- सर्वसमावेशक तपासण्या करण्यात आल्या.
- साहित्याचे वितरण होताना कोरोना पसरणार नाही याची काळजी घेण्यात आली.
- क्वारंटाइन सुविधा वाढविण्यात आल्या.
- फिव्हर क्लिनिक उभारण्यात आले.
- परिसरांसह शौचालयांची मोठया प्रमाणावर तपासणी करण्यात आली.
- खासगी क्लिनिकची मदत घेण्यात आली.
- रुग्णालये ताब्यात घेण्यात आली.

Web Title: Corono Virus: Dharavi module, which has been taking lessons, has spread all over the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.