Join us  

coronavirus : लॉकडाऊनदरम्यान 63 प्रवाशांची बेकायदेशीर वाहतूक करणारी दोन वाहने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 10:41 AM

बेकायदेशीर रित्या प्रवास करणाऱ्या नागरिकांना पनवेल शहर पोलिसांनी पकडून सिडको एक्सिबिशन सेंटर येथे दाखल केले आहे.

पनवेल -  काल रात्री 01.30 वाजता पनवेल जवळील  पळस्पे फाट्याजवळ पनवेल शहर पोलिसांच्या नाकांबदी दरम्यान लॉकडाऊन असताना देखील बेकायदेशीर रित्या प्रवास करणाऱ्या नागरिकांना पनवेल शहर पोलिसांनी पकडून सिडको एक्सिबिशन सेंटर येथे दाखल केले आहे.या प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांना पोलिसांनी जप्त केले आहे.  कन्टेनर टेम्पो क्र.  MH-04/JU 5355 व मालवाहू टेम्पो क्र. MH-43/BG-2043 मधून 22 पुरूष 25 महिला व 16 मुले असे एकूण 63 इसमांची बेकायदेशीर वाहतुक करताना मिळून आले. कंटेनर टेम्पो मधिल मजूर हे कर्नाटकला आणि मालवाहू टेम्पो मधिल सातारा येथे निघाले होते. सर्वांना सिडको एक्झिबिशन हाॅल येथे नेवून त्यांना बिस्किट वाटप करून मंडल अधिकारी व वैद्यकिय अधिकाऱ्यांचे ताब्यात दिले असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी दिली आहे.दोन्ही टेम्पो गुन्ह्यात जप्त केले आहेत. आरोपी धनराज शिवाजी अवरादे, पांडुरंग लक्ष्मण पवार, वय 49 यांना सीआरपीसी कलम 41 प्रमाणे नोटीस देऊन सोडले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनवी मुंबईपोलिस