Join us  

coronavirus: रेड झोनमधील उत्तरपत्रिका तपासणी लॉकडाउनपर्यंत जैसे थे ठेवा, प्रवासामुळे शिक्षकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 3:33 AM

शिक्षकासाठी संचारबंदी शिथिल करून त्यांना आवश्यक प्रवासासाठी पासेस पुविण्याचे पत्र मुंबई विभागीय सचिव संदीप संगवे यांच्याकडून महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांना पाठविण्यात आले आहे.

मुंबई : उत्तरपत्रिका तपासणीसाठी संचारबंदी शिथिल करण्याचे निर्देश अपर मुख्य सचिवांकडून आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता मंडळांच्या विभागीय सचिवांकडूनही संबंधित महानगरपालिका आयुक्तांना यासबंधी पुढील कार्यवाहीसाठी विनंती करण्यात आली आहे. शिक्षकासाठी संचारबंदी शिथिल करून त्यांना आवश्यक प्रवासासाठी पासेस पुविण्याचे पत्र मुंबई विभागीय सचिव संदीप संगवे यांच्याकडून महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांनी बाजूला सुटकेचा नि:श्वास सोडला आहे तर दुसरीकडे मात्र काही शिक्षकांनी याचा विरोध करत लॉकडाउन उठेपर्यंत रेड झोनमधील उत्तरपत्रिका तपासणीचे कार्य जैसे थे ठेवून शिक्षकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.शिक्षकांना संचारबंदीच्या काळात विशेष पास उपलब्ध होणार केले जाणार आहेत. ज्याच्या सहाय्य्यने उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रावरून किंवा पोस्टातून माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पोहोचवू शकतात. तसेच उत्तरपत्रिका शाळेतून संबंधित शिक्षकाच्या घरी घेऊन जाणे, परीक्षाकडून नियामक किंवा मुख्य नियमकाकडे पोहोचविणे अशी कामे या विशेष पासच्या साहाय्याने शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी करू शकणार आहेत. त्यामुळे दहावी, बारावीचा निकाल वेळेत लागू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हा रेड झोनमधील शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याची भूमिका काही शिक्षकांनी घेतली आहे.रेड झोनमधील शिक्षकांना पास मिळाला तरी मुंबईमधील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता शिक्षकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. शिक्षकांना प्रवास करताना असंख्य टप्पे पार करावे लागतील. हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घटक ठरू शकते, अशी प्रतिक्रिया भाजप शिक्षक आघाडीचे संयोजक अनिल बोरनारे यांनी दिली.शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीही रेड झोनमधील शिक्षकांंना उत्तरपत्रिका तपासणीचे काम का दिले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसशिक्षण क्षेत्रशिक्षक