Join us
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनाच्या संकटानंतर आता तरी जागे व्हा - रतन टाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 06:50 IST

मानवतेच्या दृष्टीकोनातून झोपड्यांच्या पुनर्विकास व्हावा

मुंबई : एकमेकांना खेटून असलेल्या झोपड्यांमध्ये पायाभूत सुविधांची वानवा आहे. लोकांना वास्तव्यासाठी ना पुरेशी जागा आहे, ना शुद्ध हवा. कोरोनाच्या संकटामुळे या दाटीवाटीच्या क्षेत्रांबद्दलची काळजी आणखी वाढली आहे. हा आपल्या प्रत्येकासाठी ‘वेक अप कॉल’ आहे. इथले रहिवासी नवीन भारताचाच एक भाग आहेत हे मान्य करून झोपड्यांचा अभिमानास्पद पुनर्विकास करा, असे कळकळीचे आवाहन सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटायांनी सोमवारी केले. ‘फ्यूचर ऑफ डिझाइन अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन’ या विषयावर सोमवारी पार पडलेल्या एका वेबिनारमध्ये रतन टाटा संबोधित करत होते.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यारतन टाटा