CoronaVirus News: रेल्वे डब्यांचे पुन्हा केले आयसोलेशन कक्षांत रूपांतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 06:41 IST2020-06-16T04:35:22+5:302020-06-16T06:41:46+5:30
मध्य रेल्वेला ४८२ डब्याचे रूपांतर आयसोलेशन कोचमध्ये बदलण्याची जबाबदारी देण्यात आली

CoronaVirus News: रेल्वे डब्यांचे पुन्हा केले आयसोलेशन कक्षांत रूपांतर
मुंबई : लोकमतमध्ये १४ जून रोजी ‘मुंबईत कोरोना रुग्णांना खाटा नाहीत, मात्र आयसोलेशन कक्ष रिकामे’ या शीर्षकाअंतर्गत संडे स्पेशल बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीला दुजोरा देणारे स्पष्टीकरण मध्य रेल्वे प्रशासनाने पाठवले आहे. रेल्वे कोचचे आयसोलेशन कोचमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार मध्य रेल्वेला ४८२ डब्याचे रूपांतर आयसोलेशन कोचमध्ये बदलण्याची जबाबदारी देण्यात आली. हे काम निश्चित लक्ष्य ठेवून वेळीच पूर्ण करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. श्रमिक गाड्यांची संख्या अधिक असल्याने काही डबे कोणताही खर्च न करता श्रमिक विशेष गाड्यांमध्ये वापरले आणि लगेच पुन्हा आयसोलेशन कोचसाठी तयार ठेवले, असेही मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.