Join us  

coronavirus: पायी, रेल्वे रुळावरून जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांना  प्रतिबंध करा, गृहमंत्रालयाची राज्य सरकारांना सूचना  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 11:44 PM

औरंगाबादजवळ  रेल्वे रुळावर झोपलेल्या 16 मजुर मालगाडीखाली चिरडून ठार झाले. या दुर्दैवी घटनेच्या पाश्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे.  

मुंबई -आपल्या घरी जाण्यासाठी  रस्त्यांनी किंवा रेल्वे मार्गांवरून पायी चालणाऱ्या स्थलांतरित मजुरांना प्रतिबंध करावा, अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना दिल्या आहेत. त्यांना श्रमिक स्पेशल ट्रेन किंवा बसमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी आणि त्याची उपलब्धता होईपर्यंत या मजुरांची समजूत काढण्यासाठी समुपदेशन करण्याबाबतही कळविण्यात आले आहे.  औरंगाबादजवळ  रेल्वे रुळावर झोपलेल्या 16 मजुर मालगाडीखाली चिरडून ठार झाले. या दुर्दैवी घटनेच्या पाश्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे.  स्थलातरासाठीच्या विशेष बस आणि श्रमिक स्पेशल ट्रेनने वाहतूक करण्यासाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या सहकार्याचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ सचिवांनी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एका बैठकीचे आयोजन केले होते. त्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून असे कळवले आहे की, आपल्या घरी जाण्यासाठी रस्त्यांनी किंवा रेल्वे मार्गांवरून पायी चालणाऱ्या स्थलांतरित मजुरांना प्रतिबंध करावा. या मजुरांना घरी पाठवण्यासाठी यापूर्वीच श्रमिक स्पेशल ट्रेन्स आणि बसेस चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे, यावर यामध्ये भर देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना श्रमिक स्पेशल ट्रेन किंवा बसमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी आणि तोपर्यंत या मजुरांची समजूत काढण्यासाठी समुपदेशन करावे आणि त्यांची जवळच्या निवाऱ्यांमध्ये सोय करावी.अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी जलदगतीने पाठवता यावे, यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात कोणत्याही अडथळ्याविना श्रमिक स्पेशल ट्रेन्स चालवता याव्यात याकरिता राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी सहकार्य  करण्याची सूचना केली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरससरकारमहाराष्ट्र