Join us

coronavirus: सेव्हन हिल्स रुग्णालयातही प्लाज्मा उपचारपद्धती, सचिन तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 02:05 IST

कोरोनामुळे आपल्या सर्वांच्या आरोग्यापुढे अभूतपूर्व असे आव्हान उभे राहिले आहे. या प्रसंगात आपले डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, महानगरपालिका आणि सरकारी कर्मचारी रात्रंदिवस रुग्णांना सेवा देण्यासाठी कष्ट करत आहेत, असे सचिन तेंडुलकर यावेळी सांगितले.

मुंबई : प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या हस्ते बुधवारी अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालय प्लाज्मा थेरपी युनिटचे उद्धाटन करण्यात आहे. कोरोनाचा प्रभाविपणे मुकाबला करण्यासाठी महानगरपालिकने हे प्लाज्मा थेरपी युनिट सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला.कोरोनामुळे आपल्या सर्वांच्या आरोग्यापुढे अभूतपूर्व असे आव्हान उभे राहिले आहे. या प्रसंगात आपले डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, महानगरपालिका आणि सरकारी कर्मचारी रात्रंदिवस रुग्णांना सेवा देण्यासाठी कष्ट करत आहेत, असे सचिन तेंडुलकर यावेळी सांगितले. 'जगभरातली संशोधक कोरोनावर लस आणि योग्य उपचार पद्धती शोधण्यासाठी काम करत आहेत. अत्यंत गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाज्मा थेरपी योग्य ठरत आहे. अनेकांचे जीव वाचविण्यासाठी हे सेंटर सुरु केल्याबद्दल महानगरपालिकेचे धन्यवाद' जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.त्यांना मी आवाहन करतो, की त्यांनी पुढे येऊन प्लाज्मा थेरपीसाठी रक्तदान करावे. अत्यंत गंभीर रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी यामुळे मदत होईल, असे सचिन तेंडुलकर यांनी सांगितले.देशाध्ये प्लाज्मा थेरपीच्या चाचण्यांमधून सकारात्मक निकाल पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना विरोधात लढण्यासाठी डॉक्टरांना नवे शस्त्र मिळाले आहे. आतापर्यंत सेव्हन हिल्स रुग्णालयातून सहा हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई