Join us  

Coronavirus : ओशिवरा पोलीस ठाणे बनले कोरोनाचा हॉटस्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 3:48 PM

Coronavirus : १५ पोलिसांना झाली कोरोनाची लागण

ठळक मुद्देआता ओशिवरा पोलिस ठाण्यात कोरोनचे रुग्ण मिळू लागले असून हे पोलिस ठाणे कोरोनाचा हॉट स्पॉट झाला आहे.मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांना देखिल पत्र दिले असून याकडे जातीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - एकीकडे अंधेरी ( पूर्व) सहार पोलिस ठाण्यातील ३२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असतांना,आता अंधेरी (पश्चिम) ओशिवरा पोलिस ठाण्याच्या १५ पोलिसांना  कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.ओशिवारा पोलिस ठाणे के पश्चिम वॉर्ड मध्ये मोडत असून  काल संध्याकाळ पर्यंत या वॉर्ड मध्ये कोरोनाचे १६७९ रुग्ण होते. त्याप्रमाणे आता ओशिवरा पोलिस ठाण्यात कोरोनचे रुग्ण मिळू लागले असून हे पोलिस ठाणे कोरोनाचा हॉट स्पॉट झाला आहे.

अतीश्रम,ताण आणि जास्त तास ड्युटी यामुळे पोलिसांचे आरोग्य धोक्यात आले आहे.येथील पोलिसांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.येथील एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांना कोरोनाची लागण होणे हे चिंताजनक असून यावर वेळीच ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.त्यामुळे राज्याचे गृहमंत्री म्हणून आपण जातीने लक्ष देण्याची मागणी वर्सोवा विधानसभा मतदार संघाच्या भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना एका पत्राद्वारे केली आहे. त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांना देखिल पत्र दिले असून याकडे जातीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांपासून सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची कोविड तपासणी करून घ्यावी.तसेच येथील सर्व अधिकारी व पोलिसांना क्वारंटाईन करून घेण्यात यावे आणि त्यांच्या जागी दुसरा पोलिस स्टाफ नेमण्यात यावा.तसेच सदर पोलिस ठाणे पूर्णपणे सॅनिटाईझ करून घ्यावे अशी मागणी आमदार लव्हेकर यांनी  केली आहे. येथील लोकप्रतिनिधी म्हणून या पोलिस ठाण्याला सॅनिटायझर मशीन,केमिकल,सुरक्षा किट दिल्याचे त्यांनी शेवटी  सांगितले.

बापरे! भाडं दिलं नाही म्हणून घरमालकाच्या मुलाने जोडप्यावर झाडली गोळी; एकाचा मृत्यू

 

लॉकडाऊनदरम्यान जप्त केलेली दारू विकली जात होत पोलीस ठाण्यात 

 

जंगलात नेऊन भावाने मित्रासह बहिणीवर केला सामूहिक बलात्कार अन् केली हत्या

टॅग्स :पोलिसकोरोना वायरस बातम्यामुंबई