Join us
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: मोठ्ठा दिलासा! राज्यात कोरोनावर मात केलेल्यांचा आकडा पन्नास हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 21:55 IST

राज्यात आज १६३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९७८ झाली आहे.

मुंबई  - एकीकडे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना आज राज्याला मोठा दिलासा देणारे वृत्त आले असून, राज्यात कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा पन्नास हजारांवर पोहोचला आहे.  राज्यात आज १६३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९७८ झाली आहे.दरम्यान, आज कोरोनाच्या ३३९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात ५३ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ५७ हजार ७३९ नमुन्यांपैकी  १ लाख ७ हजार  ९५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख  ८७ हजार  ५९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५३५ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  ७७ हजार १८९ खाटा उपलब्ध असून सध्या २९ हजार ६४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ८० (मुंबई ६९, ठाणे ४, उल्हासनगर ५, पालघर १, वसई-विरार १), पुणे- १४ (पुणे ११, सोलापूर ३), नाशिक-१४ (नाशिक ३,जळगाव ११), कोल्हापूर-१ (रत्नागिरी १), औरंगाबाद-७ (औरंगाबाद ७), लातूर -२ (उस्मानाबाद २), अकोला-२ (अकोला २).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८१ पुरुष तर ३९ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२० मृत्यूपैकी ६०वर्षे किंवा त्यावरील ६६ रुग्ण आहेत तर ४० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १४ जण ४० वर्षांखालील आहे. या १२० रुग्णांपैकी ८० जणांमध्ये ( ६७ टक्के)  मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३९५० झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४३ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २ जून ते ११ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५८,जळगाव – ८, नाशिक -३, ठाणे -३, उल्हासनगर -३, रत्नागिरी -१ , पुणे १ मृत्यू असे आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई