CoronaVirus: केंद्रीय चमूच्या हवाल्याने दिलेली रुग्णसंख्या चुकीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 03:31 IST2020-04-23T03:30:28+5:302020-04-23T03:31:38+5:30

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले स्पष्ट

CoronaVirus number of covid given with central teams reference is incorrect | CoronaVirus: केंद्रीय चमूच्या हवाल्याने दिलेली रुग्णसंख्या चुकीची

CoronaVirus: केंद्रीय चमूच्या हवाल्याने दिलेली रुग्णसंख्या चुकीची

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी ही मे महिन्याच्या मध्यापर्यंत काही लाखांत पोहोचेल अशा आशयाच्या बातम्या बुधवारी माध्यमातून केंद्रीय चमूच्या हवाल्याने प्रकाशित झाल्या आहेत. रुग्ण संख्येतील लाखोंच्या वाढीबद्दल केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे.

केंद्रीय चमूने आपल्या अभ्यास दौºयादरम्यान महापालिका आयुक्त यांच्यासह महापालिकेतील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या मुंबई महापालिका क्षेत्रातील परिस्थिती आणि त्या अनुषंगाने महापालिका करीत असलेल्या उपाययोजना याविषयीची माहिती घेतली, असे मुंबई महापालिकेने सांगितले. संबंधित केंद्रीय चमूने प्रशासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक, वैद्यकीय योजनांबाबत समाधान व्यक्त केलेले आहे. त्याचबरोबर विविध माध्यमांमध्ये ज्या प्रकारची अतिरंजित माहिती प्रकाशित झाली आहे, तशा प्रकारचे कोणतेही प्रत्यक्ष वा सूचक वक्तव्य चमूने महापालिका आयुक्तांकडे किंवा इतर कोणत्याही वरिष्ठ अधिकाºयांकडे केले नाही, असे पालिकेने स्पष्ट केले.

Web Title: CoronaVirus number of covid given with central teams reference is incorrect