CoronaVirus News: Worrying! Corona kills 99 doctors in India, Indian Medical Association's 'Red Alert' | CoronaVirus News : चिंताजनक! देशात ९९ डॉक्टरांचा कोरोनाने बळी, इंडियन मेडिकल असोसिएशनचा ‘रेड अलर्ट

CoronaVirus News : चिंताजनक! देशात ९९ डॉक्टरांचा कोरोनाने बळी, इंडियन मेडिकल असोसिएशनचा ‘रेड अलर्ट

मुंबई : कोरोना योद्धे अर्थात डॉक्टरच मोठ्या संख्येने कोरोनाचे शिकार होत आहेत. आतापर्यंत देशात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या ९९ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तर १ हजार ३०९ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.

देशाचा मृत्यूदर पाच टक्के असताना आयएमएच्या डॉक्टरांचा मृत्यूदर १० टक्के असल्याने आयएमएने चिंता व्यक्त केली आहे. आपल्या सर्व डॉक्टरांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करत अधिक काळजी घेण्यास सांगितले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माहितीनुसार, मार्चपासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत १ हजार ३०२ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ५८६ प्रॅक्टिशनर डॉक्टर, ५६६ निवासी डॉक्टर, १०० हाऊस सर्जन आहेत. यातील ९९ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.

सर्वाधिक ७३ मृत्यू हे ५० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या डॉक्टरांचे झाले असून, ही टक्केवारी ७५ टक्क्यांच्या घरात आहे. तर ३५ वर्षांपर्यंत सात तसेच ३५ ते ५० वयोगटातील १९ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे डॉक्टरांच्या झालेले मृत्यू शंभराच्या टप्प्यावर असल्याने डॉक्टरांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. त्यात इंडियन मेडिकल असोसिएशनने रेड अलर्ट जारी करत डॉक्टरांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन केल्याची माहिती आयएमए सदस्य आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिली आहे.

डॉक्टर योग्य ती खबरदारी घेत आहोत. पण तरीही अनेक डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यामुळे पीपीई किटच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह आहे. सरकारने पीपीई किटच्या दर्जावर विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी डॉ. उत्तुरे यांनी केली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: Worrying! Corona kills 99 doctors in India, Indian Medical Association's 'Red Alert'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.