CoronaVirus News: दिलासादायक! राज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; मात्र सावधगिरी बाळगणे आवश्यक

By मुकेश चव्हाण | Published: December 17, 2020 08:55 PM2020-12-17T20:55:35+5:302020-12-17T20:55:49+5:30

राज्यात आतापर्यंत 48 हजार 499 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

CoronaVirus News: reports 3,880 new coronavirus cases in maharashtra | CoronaVirus News: दिलासादायक! राज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; मात्र सावधगिरी बाळगणे आवश्यक

CoronaVirus News: दिलासादायक! राज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; मात्र सावधगिरी बाळगणे आवश्यक

Next

मुंबई: राज्यात गेल्या 24 तासांत नव्या 3880 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आज 65 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 60905 पर्यत खाली आली आहे. तसेच आज 4358 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. 

राज्यात आतापर्यंत 48 हजार 499 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 17,74,255 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनाचा रिकव्हरी रेट 94.14 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे महाराष्ट्र करोनामुक्तीच्या दिशेने वेगाने वाटचाल करू लागल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. मात्र नागरिकांनी सावधगिरी बाळगणे खूप आवश्यक असणार आहे. 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 19 लाख 33 हजार 956 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18 लाख 84 हजार 773 (15.79 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 6 हजार 914 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर 4 हजार 33 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

देशात जानेवारीपासून लसीकरण?; सिरमच्या अदार पुनावालांनी दिले मोठे संकेत-

कोरोना लसीकरणावरून देशवासियांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ऑक्सफर्ड यूनिवर्सिटीसोबत मिळून कोरोना लस उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी लसीकरणावर मोठे संकेते दिले आहेत. डिसेंबरच्या शेवटी कोरोना लसीच्या आपत्कालीन लसीकरणाला परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. 

अदार पुनावाला यांनी एका ग्लोबल बिझनेस समिटला संबोधित करताना ही माहिती दिली. आम्हाला आशा आहे की, या महिन्याच्या शेवटी एसआयआयला कोरोना लसीचे लायसन मिळू शकते. मात्र, त्याच्या वापराची मंजुरी नंतर मिळेल. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर जानेवारी 2021 पासून भारतात  कोरोना लसीकरण अभियान सुरु केले जाईल. सिरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटनची अॅस्ट्राझिनेकासोबत मिळून ही लस विकसित करत आहे. 

Web Title: CoronaVirus News: reports 3,880 new coronavirus cases in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.