CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहचले 93.98 टक्क्यांवर
By मुकेश चव्हाण | Updated: December 8, 2020 22:09 IST2020-12-07T22:13:05+5:302020-12-08T22:09:32+5:30
राज्यात आतापर्यंत 47 हजार 639 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहचले 93.98 टक्क्यांवर
मुंबई: राज्यात गेल्या 24 तासांत नव्या 3075 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आज 40 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 75767 पर्यत खाली आला आहे. तसेच आज 7345 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात आतापर्यंत 47 हजार 639 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 1730715 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज दिवसभरातील कोरोनाबाबत दिलासादायक बाब म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून 92 टक्क्यांवर स्थिरावलेला कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढून अखेर 93.98 टक्क्यांवर पोहचला आहे. त्याचप्रमाणे गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 40 पर्यत खाली आल्याने राज्यासाठी हे चांगले संकेत मानले जात आहे.
राज्यात आज 3075 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7345 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1730715 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 75767 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.98% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 7, 2020
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 13 लाख 18 हजार 721 चाचण्यांपैकी 18 लाख 55 हजार 341 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यात 5 लाख 55 हजार 180 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, 5 हजार 565 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra reports 3,075 fresh COVID-19 cases, taking tally to 18,55,341; 40 deaths push toll to 47,774: state health department
— Press Trust of India (@PTI_News) December 7, 2020
राज्याची राजधानी मुंबईत आज 544 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 1600 रुग्णांचा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Maharashtra: Mumbai's COVID-19 tally increases to 2,86,590 with addition of 544 new cases, nearly 1,600 patients discharged from hospitals following recovery, say officials
— Press Trust of India (@PTI_News) December 7, 2020
दरम्यान, दिवाळीनंतर राज्यासह मुंबईत कोरोनाचा धोका वाढेल, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली होती. मात्र समाधानकारक बाब म्हणजे, तज्ज्ञांनी वर्तविलेल्या निरीक्षणानुसार राज्यासह मुंबईची रुग्णसंख्या व मृत्यूच्या प्रमाणात तितकीशी वाढ झाली नसल्याचे समोर आले. आता टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी डिसेंबरअखेर कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.
राज्याच्या टास्क फोर्समधील डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, असे म्हणता येणार नाही. परंतु, राज्यातील तापमानात घट झाल्यास शिवाय प्रदूषणात वाढ झाल्यास कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. यापूर्वी मे, जून आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता वाढली होती.