Join us  

CoronaVirus News : रुग्ण, डॉक्टरांवर रेमडेसिवीर, टोसिलीझूमॅबचे ‘गारुड’!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 3:53 AM

राज्यातील सुमारे ४ हजारांपेक्षा कमी कोरोनाग्रस्त रुग्णांवर आतापर्यंत १६,७२० रेमडेसिवीरचा वापर झाला. ११,८३५ टोसिलीझूमॅब इंजेक्शन १० हजारपेक्षा कमी रुग्णांना दिली.

- संदीप शिंदेमुंबई : ठाण्याच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पालिका अधिकाºयासाठी रेडमेसिवीरची तजवीज करून ठेवा, अशा सूचना डॉक्टरांनी दिल्या. मात्र, बराच खटाटोप करून हे औषध मिळाले नाही. परंतु, त्याशिवायच रुग्ण आता बरा होऊन घरी परतला आहे. तर, मुंबईतील एका रुग्णालयात तुम्ही रेमडेसिवीर आणि टोसिलीझूमॅब का देत नाही, अशी विचारणा रुग्णाच्या नातेवाइकांनीच डॉक्टरांना केल्याची माहिती हाती आली आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे डॉक्टर, रुग्णांचे नातेवाईकही गोंधळलेल्या मन:स्थितीत असून या औषधांनी त्यांच्यावर एक प्रकारे गारुड केल्याचे चित्र आहे.राज्यातील सुमारे ४ हजारांपेक्षा कमी कोरोनाग्रस्त रुग्णांवर आतापर्यंत १६,७२० रेमडेसिवीरचा वापर झाला. ११,८३५ टोसिलीझूमॅब इंजेक्शन १० हजारपेक्षा कमी रुग्णांना दिली. गेल्या काही दिवसांत समाज माध्यमांमध्ये या औषधांचा अवास्तव प्रचार झाला. त्यामुळे त्यांची मागणी झपाट्याने वाढली. औषधांच्या तुटवड्यामुळे काळाबाजारही वाढला आहे. रुग्णाच्या नातेवाइकांकडून या औषधांच्या वापराची विनंती होत असल्याने डॉक्टरांवरील तणावही अप्रत्यक्षरीत्या वाढत असल्याचे सांगण्यात आले.या औषधांच्या वापराची गरज नाही तेथेही वापर केला जात असल्याचे निरीक्षण राज्य सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्समधील सदस्यांनी नोंदविले. त्यामुळे या औषधांसह फेविपिरावीर, प्लाझ्मा थेरपीच्या वापराबाबतचा प्रोटोकॉल ठरविण्याची गरजही टास्क फोर्सच्या सदस्यांनी व्यक्त केली.ही संजीवनी बुटी नव्हेरेमडेसिवीर, टोसिलीझूमॅब ही औषधे नव्हती तेव्हाही गंभीर कोरोनाग्रस्त बरे होत होते. मात्र, सध्या ही औषधे संजीवनी बुटी असल्याचे वातावरण आहे. आता डॉक्टरच नव्हे तर रुग्णांचे नातेवाईकही या औषधांसाठी आग्रह धरू लागले आहेत. त्यामुळे त्याची मागणी अनपेक्षित वाढल्याचे कोविड नियंत्रणासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.रुग्णांना प्लाझ्मादेणे बंधनकारक करापुणे : कोरोनाबाधित रूग्ण वाढत आहेत. त्याचवेळी अँटिव्हायरल औषधांचा तुटवडा जाणवत आहे. याचा विचार करता महाराष्ट्र सरकारने रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर वाढवला पाहिजे. पुरेसे दाते उपलब्ध नसल्यामुळे प्लाझ्मा उपचारपद्धतीत अडचणी येत आहेत. सरकारी, खासगी रुग्णालयांमधून कोरोनामुक्त झालेल्या सर्व रुग्णांना प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान बंधनकारक करावे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) राज्य शासनाकडे केली आहे.फोन, औषध नॉट रिचेबल- रेमडेसिवीर आणि टोसिलीझूमॅब या औषधांच्या उपलब्धतेची ठिकाणे आणि संबंधितांच्या फोन नंबरचे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाले आहेत. सरकारी यंत्रणांनीही काही क्रमांक दिले आहेत. मात्र, त्यापैकी बहुतांश फोन नॉट रिचेबल आहेत. जे फोन सुरू आहेत त्यावर औषध उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची परवड सुरूच आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसआरोग्य