मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शहरातील खासगी डॉक्टरांनी त्यांची सेवा सुरू ठेवावी, असे निर्देश सरकारने दिले आहेत. मात्र, पीपीई किटचे संरक्षण मिळत नाही तोपर्यंत सेवा सुरू न करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. मुंबई पालिकेने हा तिढा सोडविला असून आता वैद्यकीय सेवा सुरू ठेवणाऱ्या खासगी डॉक्टरनाही पीपीई किट्सचे संरक्षण मिळणार आहे.शहरातील कंटेनमेंट झोनजवळच्या आणि आतमधील खासगी दवाखाने सुरू ठेवणाºया डॉक्टरनाच ही सुविधा मिळेल. याशिवाय रुग्णवाहिका चालक आणि क्लीनरलाही पीपीई किट्स देण्यात येतील, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
CoronaVirus News in Mumbai : खासगी डॉक्टरना मिळणार पीपीई किट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 05:22 IST